हसीनांपासून माल्ल्यापर्यंत सर्वांचं आवडतं ठिकाण लंडन! तिथं स्थायिक होण्यासाठी नेमकं काय लागतं?
शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला लंडनमध्ये कायमच राहायचं असेल तर काय नियम आहेत, ते समजून घ्या.
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडला असून त्या लंडनमध्ये स्थायिक होत आहेत. सोमवारी शेख हसीना या भारतात येऊन आश्रय घेतला. यानंतर त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचं विशेष विमान हिडन एअरपोर्टवर उतरवण्यात आलं आहे. तेथे त्यांना सुरक्षित जागेवर ठेवण्यात येणार आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ढाकाहून आगरतला येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. आता आगरतलाहून नवी दिल्लीला आल्यानंतर ती लंडनला जाणारे विमान पकडेल. देशातून पळून गेल्यानंतर त्या भारतातही आश्रय घेऊ शकल्या असत्या. पण त्यासाठी त्यांनी लंडनची निवड केली आहे. यामागे काय कारणे असू शकतात? तसेच लंडनमध्ये कायमचे स्थायिक व्हायचे असेल तर काय निमय आहेत?