Vastu Tips For Braham Kamal : लाखात एक आहे 'हे' सफेद फूल; घरात येताच होईल भरभराट

Vastu Tips For Braham Kamal: तुम्ही वास्तूशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन करता का? तर या नियमाकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.   

Jan 12, 2023, 14:50 PM IST

Vastu Tips For Braham Kamal: हिंदू धर्मामध्ये काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये अगदी तुम्ही राहता त्या घरापासून ते तुम्ही काम करता त्या वास्तूपर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. 

1/5

अगदी घरात आवडीनं लावलेल्या रोपट्यांनाही यातून वगळण्यात आलेलं नाही. तुम्हीसुद्धा घरात किमान एक फुलझाड किंवा एखादं रोपटं लावलंच असेल. आता यामध्ये आणखी एकाची भर घाला. कारण, त्यामुळं तुमच्यावर कायमच देवी लक्ष्मीचा वरदहस्त असेल. 

2/5

हे फूल आहे, ब्रह्म कमळ. ब्रह्मदेवांचं प्रतीक, असणारं हे फूल शंकराच्या आराधनेसाठीसुद्धा वापरतात. असं म्हणतात की जे कुणी हे फूल फुलताना पाहतं त्याच्या आयुष्यात सुखाची बरसात होते. हे फुलझाड घरात लावल्यानं नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. 

3/5

वास्तूसाठी अत्यंत लाभदायक असणाऱ्या या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत. उत्तराखंड आणि हिमालयातील पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या रुपकुंड, हेमकुंड, केदारनाथ अशा ठिकाणांवर हे फुल अधिक प्रमाणात आढळतं. 

4/5

वास्तू तज्ज्ञांच्या मते हे फूल देवघरात ठेवलं जातं. जास्त ऊन असणाऱ्या ठिकाणी हे फुलझाड ठेवू नये. 

5/5

असं म्हणतात की, हे फूल लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळं ते देवीला अर्पण केल्यास तिची कृपा सदैव राहते.