160 KM वेग, ट्रेनमध्ये विमानातील सुविधा, अशी असेल वंदे भारत स्लीपर आणि मेट्रो, पाहा ट्रेनचे Luxury फोटो

रेल्वे लवकरच दोन नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत स्लीपर आणि वंदे मेट्रोबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे. लवकरच या दोन ट्रेन धावणार आहेत. 

| Jun 16, 2024, 15:41 PM IST

रेल्वे लवकरच दोन नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत स्लीपर आणि वंदे मेट्रोबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे. लवकरच या दोन ट्रेन धावणार आहेत. 

 

1/9

160 KM वेग, ट्रेनमध्ये विमानातील सुविधा, अशी असेल वंदे भारत स्लीपर आणि मेट्रो, पाहा ट्रेनचे Luxury फोटो

 Vande Bharat sleeper and Vande Metro train  Indian Railway lauch new trains know all about

 रेल्वे स्लीपर वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेनची सुरुवात करत आहे. या ट्रेन पूर्णपणे तयार झाल्या आहेत. या ट्रेनची पहिले फोटोदेखील समोर आले आहेत. सध्या या ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहे. 

2/9

वंदे भारत स्लीपर लक्झरी ट्रेन सुरू होण्यासाठी सज्ज आहे. ट्रेन पूर्णपणे तयार आहे असून फक्त रेल्वेच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना विमानासारखी सुविधा मिळणार आहे. रेल्वे ऑगस्ट महिन्यात या ट्रेनची सेवा सुरू करू शकते, अशी चर्चा आहे. ट्रेनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा कमाल वेग ताशी 220 किलोमीटर असेल.तर सुरुवातीचा वेग १४० किमी असेल.  

3/9

वंदे भारत स्लीपर ट्रेन विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. लोकांचा प्रवास आरामदायी व्हावा या हेतूने कोच तयार करण्यात आले आहेत.वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. ट्रेनमध्ये 16 बोगी असतील.  

4/9

 ट्रेनमध्ये तीन प्रकारचे डबे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी आणि थर्ड क्लास एसी डबे असतील, ज्यामध्ये सर्व सुविधा असतील. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एका वेळी जास्तीत जास्त ८२३ प्रवासी प्रवास करू शकतील. त्यापैकी 611 प्रवासी थर्ड एसी कोचमध्ये, 188 प्रवासी सेकंड एसी कोचमध्ये आणि 24 प्रवासी फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवास करू शकतील.  

5/9

प्रवाशांना आरामदायी आसने, सेन्सर लाइट्स, मधल्या आणि वरच्या बर्थवर चढण्यासाठी पायऱ्यांची सुविधा मिळणार आहे. सर्व दिवे सेन्सरने सुसज्ज असतील. ट्रेनमध्ये बायो टॉयलेट यंत्रणा बसवण्यात आली आहे. फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये टॉयलेटमध्ये आंघोळीसाठी शॉवरची सुविधाही असेल.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन गोरखपूर ते दिल्ली दरम्यान धावू शकते. ही ट्रेन उत्तर प्रदेशातील 9 शहरांना जोडेल.  

6/9

दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे मेट्रो या इंटरसिटी ट्रेनचा सरासरी वेग ताशी 130 किलोमीटर असेल.रोज दुसऱ्या शहरात कामासाठी जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुकर होईल. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वंदे मेट्रो ट्रेन लवकरच धावणार आहे.संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना त्यात प्रवास करताना थकवा जाणवणार नाही.  

7/9

पहिल्या वंदे मेट्रोमध्ये 12 डबे बसवण्यात आले आहेत.ट्रेनमध्ये पॅनोरॅमिक खिडक्या आणि आधुनिक टॉयलेट बसवण्यात आले आहेत. स्वच्छतागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. प्रवाशांना माहिती देण्यासाठी आरामदायी खुर्च्यांसोबतच एलसीडी डिस्प्ले लावण्यात आले आहेत  

8/9

वंदे मेट्रोमध्ये प्रत्येक बोगीत 100 प्रवाशांची क्षमता असणार आहे. बाकीचे लोक उभं राहूनही प्रवास करु शकणार आहेत.

9/9

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे देशातील 124 शहरांमध्ये वंदे मेट्रो ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. ही ट्रेन लखनौ-कानपूर, आग्रा-मथुरा, दिल्ली-मथुरा, भुवनेश्वर-बालासोर आणि तिरुपती-चेन्नई या शहरांमध्ये धावेल