रस्त्यावर वडापाव विकून दिवसाला तब्बल इतके कमावते चंद्रिका दीक्षित; तुमचा महिन्याचा पगारही इतका नसेल

'बिग बॉस ओटीटी' चं नवं पर्व म्हणजेच सीझन 3 सुरु झाला आहे. या सीझनमध्ये सुत्रसंचालन अनिक कपूर करताना दिसत आहेत. त्यांच्या झक्कास स्टाइलमध्ये अनिल कपूर यांनी शोला सुरुवात केली आहे. तर शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची ओळख देखील करुन दिली. तर शोची पहिली कन्फर्म कंटेस्टंट चंद्रिका दीक्षित कन्फर्म झाली. 

Diksha Patil | Jun 22, 2024, 16:14 PM IST
1/7

कधीही स्वत: साठी भांडणं असो किंवा मग रस्त्यावर जोराजोरात भांडण करणं चंद्रिका दीक्षितचं नाव हे नेहमीच चर्चेत असतं. चर्चेत कसं रहायचं हे चंद्रिकाला चांगलंच माहित आहे असं नेहमीच नेटकरी बोलताना दिसतात. 

2/7

आता हिच चंद्रिका शोमध्ये आली याचा अर्थ प्रेक्षकांचे मनोरंजन होणार. शोमध्ये आल्यानंतर अनिल कपूर यांना तिची व्हायरल झालेल्या भांडणाविषयी सांगितलं. इतकंच नाही तर तिनं तिच्या एक दिवसाच्या कमाई विषयी देखील सांगितलं आहे. 

3/7

'बिग बॉस ओटीटी 3' चंद्रिका दीक्षितनं दिल्लीच्या रस्त्यावर व्हायरल होत असलेल्या भांडणाविषयी स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. तिनं सांगितलं की तिला तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवसी भंडारा करायचा होता. 

4/7

पुढे चंद्रिका म्हणाली की 'प्रत्येक आईला तिच्या मुलांसाठी काही तरी चांगलं करायचं असतं. लोकं टीका करण्यासाठी तयार आहेत. काही तरी लोक बोलणारच आहे आणि त्यांचं तेच काम आहे. नेहमीच दुसऱ्यांच्या कथा आणि संघर्षांविषयी जाणून घेण्यासाठी टीका करतात.'

5/7

याशिवाय अनिल कपूर यांच्या समोर चंद्रिका दीक्षितनं वडा पाव विकूण होणाऱ्या कमाई विषयी देखील सांगितलं. 

6/7

चंद्रिकानं सांगितलं की 'ती एका दिवसात वडा-पाव विकून 40 हजारांपर्यंत कमावते. जर तिनं एका महिन्यात सुट्टी न घेता काम केलं तर ती जवळपास 12 लाख रुपयांपर्यंत कमावते.' 

7/7

चंद्रिकानं सांगितलेल्या तिच्या या कमाईविषयी ऐकताच सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे.