UPSC IAS 2023 Application Correction: अर्जात सुधारणा करण्याची शेवटची संधी! असा Correct करा भरलेला फॉर्म

UPSC IAS 2023 Application Correction: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना फॉर्ममधील चूका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. सिव्हील सर्व्हिस (प्रायमरी) परीक्षा 2023 चे आधी भरलेल्या फॉर्ममध्ये उमेदवारांना 22 फेब्रुवारी 2023 बदल करता येणार आहे. हे बदल कसे करावेत जाणून घेऊयात...

Feb 22, 2023, 13:38 PM IST
1/7

UPSC IAS 2023 Application correction

युपीएससी सीएसई 2023 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचा फॉर्म अधिकृत वेबसाईटवर बदलता अपडेट करता येणार आहे. युपीएससी डॉट जीओव्ही डॉट इन upsc.gov.in. या वेबसाईटवरुन हे बदल करता येणार आहेत.

2/7

UPSC IAS 2023 Application correction

आधी भरलेल्या फॉर्ममध्ये बदल करण्यासाठीची ही सुविधा 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे. 

3/7

UPSC IAS 2023 Application correction

या कालावधीमध्ये कोणत्याही उमेदवाराला नव्याने अर्ज भरता येणार नाही. केवळ आधी भरलेल्या अर्जांमध्ये बदल करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

4/7

UPSC IAS 2023 Application correction

कसं करावं करेक्शन? upsc.gov.in. या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटच्या वरील भागात युपीएससी सीएसई एक्झाम 2023 ऑनलाइन फॉर्म करेक्शन नावाची लिंक क्लिक करावी.  

5/7

UPSC IAS 2023 Application correction

लॉगइन ईमेल आयडी आणि पासवर्ड अशी आवश्यक ती माहिती भरावी आणि लॉगइन करावं. अर्जामध्ये आवश्यक ते बदल करावेत.

6/7

UPSC IAS 2023 Application correction

केलेले बदल सबमीट करण्याआधी एकदा तपासून पहावेत. त्यानंतर बदल सबमीट करुन लॉगआऊट करावं.

7/7

UPSC IAS 2023 Application correction

युपीएससी आयएएसच्या प्रिलिम परीक्षा 28 मे रोजी होणार आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.