UPSC result 2022: यूपीएससीत मुलींचा झेंडा! पहिल्या चार नंबरवर मुलीच, महाराष्ट्राच्या कन्येचीही भरारी

UPSC Civil Services Result 2022 Top Four Rankers: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात UPSC 2022 परीक्षेचा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्या चार नंबरवर मुलींनी बाजी मारली आहे. 

| May 23, 2023, 19:10 PM IST
1/5

इशिता किशोर

यूपीएससी 2022 परीक्षेच्या निकालात संपूर्ण देशात इशिता किशोरने पहिलं  स्थान पटकावलं आहे. इशिता किशोर हिने दिल्ली विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. इशिताचे वडिल इंडियन एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत. वडिलांना देशसेवेसाठी काम करताना पाहून इशिताने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. देशसेवेसाठी काम करण्याचा निश्चय तीने केला होता. 

2/5

गरिमा लोहिया

देशात दुसऱ्या स्थानावर असलेल्या विद्यार्थिनीचं नाव गरिमा लोहिया असं आहे. गरिमाने किरोडीमल कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली आहे. गरिमाने आपल्या यशाचं श्रेय आपलं कुटुंब आणि मित्रपरिवाराला दिलं आहे. लॉकडाऊन काळात गरिमाने ऑनलाईन अभ्यास करत हे यश मिळवलं आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीने मेहनत कठोर मेहनीचा सल्ला दिला आहे. 

3/5

उमा हरिथी

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमा हरिथीने आयआयटी हैदराबादमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे. 

4/5

स्मृती मिश्रा

चौथ्या क्रमांकावर दिल्लीतल्या मिरांडा हाऊस कॉलेजच्या स्मृती मिश्राने बाजी मारली आहे. स्मृती मिश्राने बीएससीमध्ये पदवी संपादन केली आहे.  स्मृतीचे वडिल हे पोलीस असून ते बरेलीत तैनात आहेत. मुलीच्या यशाची बातमी मिळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

5/5

कश्मिरा संख्ये

यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तो ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संख्ये हिने. कश्मिराने देशात पंचवीसावा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय. कश्मिरा डॉक्टर असून त्या डेंटिस्ट आहेत. IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करण्याचं ध्येय तीने बाळगलं आहे.  कश्मिरा संखे ही वंजारी समाजातील पहिली महिला आयएएस झाली आहे.