Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो

Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच 

Feb 08, 2023, 11:05 AM IST

Turkey earthquake : सोमवारी तुर्कीमध्ये आलेल्या प्रचंड भूकंपामुळं मोठं नुकसान झालं. यामध्ये आतापर्यंत 7 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे. 

1/8

Turkey earthquake death toll

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

तुर्कीमध्ये सध्या बचावकार्याला वेग आला असला तरीही दशकातील सर्वाधिक विध्वंसक भूकंपातून हा देश सावरण्यास बराच वेळ जाईल ही बाब नाकारता येत नाही. 

2/8

Turkey

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

तुर्कीमध्ये होणारी हानी आणि एकंदर चित्र पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. 

3/8

Turkey earthquake Before After photos

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

तुर्कीमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष असून, याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत आहेत. 

4/8

Turkey earthquake news

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

यामध्ये एका प्रतिष्ठित माध्यम समूहाकडून तुर्कीतील काही ठिकाणांचे Before - After फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. 

5/8

Turkey earthquake latest news

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

या फोटोंमध्ये भूकंपाचं केंद्र असणाऱ्या गाजियांटेप शहरापासून इतरही अनेक भागांच्या फोटोंचा समावेश आहे. 

6/8

Turkey earthquake PHOTOS

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

जिथं काही ऐतिहासिक वास्तूंपासून इमारतीच्या इमारती मातीमोल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

7/8

Turkey earthquake

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

तुर्कीतील भूकंपानंतर समोर आलेल्या अहवालानुसार येथील टेक्टोनिक प्लेट जवळपास तीन मीटरच्या फरकानं सरकली ज्यामुळं हा अतिप्रचंड भूकंप आला. 

8/8

Turkey earthquake updates

Turkey earthquake updates Before After devastating photos goes Viral

तज्ज्ञांच्या मते सध्या एनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेट मध्ये असणाऱ्या 225 किमीपर्यंतच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. (सर्व छायाचित्र- बीबीसी)