मुलायम, चमकदार केसांसाठी घरच्या घरी करा केराटिन ट्रिटमेंट

Hair Care: रोजच्या धावपळीमुळे केस निर्जीव होतात. अशा परिस्थितीत केसांचे पोषण होणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही केराटिन ट्रिटमेंटचा वापर करू शकता. केराटिनमुळे केस मऊ, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे का?

Oct 07, 2024, 13:00 PM IST

Hair Treatment at Home: केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही केराटिन हेअर ट्रीटमेंटचा वापर करू शकता. केराटिन खराब झालेले, कोरडे केस दुरुस्त करण्यास मदत करते. या ट्रीटमेंटमध्ये केमिकलमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टायलिंगमुळे खराब झालेल्या केसांना पोषण देते. पण ब्युटी पार्लरमध्ये केराटिन ट्रिटमेंट करणे खूप महाग आणि वेळखाऊ असते. पण आता तुम्ही घरच्या घरी स्वस्तात आणि कमी वेळात केराटिन ट्रिटमेंट करू शकता.

 

1/7

मुलायम, चमकदार केसांसाठी घरच्या घरी करा केराटिन ट्रिटमेंट

2/7

शॅम्पू करा

सर्वात आधी कंडिशनर न लावता फक्त शॅम्पूने स्वच्छ केस धुवून घ्या. त्यामुळे केसांमधील धूळ आणि तेल निघून जाते .

3/7

केस कोरडे करा

केस धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने केस पूर्णपणे कोरडे करा. त्यानंतर केसांमधून हळूहळू कंगवा फिरवा.  

4/7

हेअर केराटिन मास्क लावा

केस कोरडे झाल्यावर सगळ्या भागांमध्ये केराटिन हेअर मास्क नीट लावून घ्या. तो हेअर मास्क 30 ते 40 मिनिटे ठेवा. तुम्ही दुकानातून केराटिन मास्क आणू शकता किंवा घरच्या घरीही हा मास्क तयार करू शकता

5/7

मसाज करा

30 मिनिटे केराटिन मास्क लावल्यानंतर 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.  

6/7

केस धुवा

केराटिन मास्क काढून टाकण्यासाठी पुन्हा एकदा शॅम्पूने केस धुवा. सर्व केमिकल काढून टाकण्यासाठी आपले केस शॅम्पूने धुवा. केमिकल्स निघण्यासाठी केस चांगले धुवा.

7/7

ब्लो ड्राय आणि आयनिंग करा

ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तुमचे केस सेट किंवा सरळ करायचे असतील तरच तुम्ही ड्रायर किंवा स्ट्रेटनरनचा वापर करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)