भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!

नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.

| Aug 12, 2024, 16:45 PM IST

New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.

1/9

भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही. 

2/9

1 सप्टेंबर 2024 पासून नवा नियम

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

आता टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI,1 सप्टेंबर 2024 पासून नवा नियम लागू करणार आहे. 

3/9

फसव्या लिंकपासून दिलासा

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

1 सप्टेंबरपासून देशभरातील मोबाईल युजर्सना फसव्या लिंक आणि मेसेजपासून दिलासा मिळणार आहे. अशा टेलीमार्केटर्सना ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे.

4/9

8 ऑगस्टला मिटींग

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

TRAI ने टेलीकॉम सर्व्हिस प्रोवायडर्स एअरटेल, जीओ, बीएसएनएल, व्हीआय, एमटीएनएल सहित टेलिमार्केटर्ससोबत 8 ऑगस्टला मिटींग घेतली.ज्यात मार्केटिंगच्या कॉल्ससंदर्भात निर्देश जारी करण्यात आले. 

5/9

लाईन्सचा गैरवाप

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

जर एखादी संस्था स्पॅम कॉल करण्यासाठी तिच्या SIP/PRI लाईन्सचा गैरवापर करत असेल, तर घटकाची सर्व दूरसंचार संसाधने त्याच्या दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) डिस्कनेक्ट केली जातील आणि ती संस्था ब्लॅक लिस्टेड केली जाईल.

6/9

2 वर्षांपर्यंत ब्लॅकलिस्ट

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

ही माहिती दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) इतर सर्व TSP सह शेअर केली जाईल, जे त्या बदल्यात, त्या घटकाला दिलेली सर्व दूरसंचार संसाधने कापून टाकतील आणि 2 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ती ब्लॅकलिस्ट करतील.

7/9

संसाधने दिली जाणार नाहीत

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

ब्लॅकलिस्टिंगच्या कालावधीत कोणत्याही TSP ला कोणतीही नवीन दूरसंचार संसाधने दिली जाणार नाहीत.

8/9

परवानगी नाही

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

ज्या मेसेजमध्ये स्पॅम यूआरएल किंवा एपीके फाईल्स असतील अशा कोणत्याच मेसेजला पाठवण्याची परवानगी 1 सप्टेंबर 2024 पासून मिळणार नाही. 

9/9

31 ऑक्टोबर 2024 पर्यंतचा वेळ

TRAI New mobile calling rule From 1 September Tech Marathi News

टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सना एंटिटि आणि टेलीमार्केटर चैन बायडिंगची अमंलबजावणी करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतचा वेळ देण्यात आलाय.