....म्हणून 'या' बाईकस्वारांना हात दाखवून थांबवतात ट्रॅफिक पोलिस

Traffic Rules : बाईक चालवताना कधी ट्रॅफिक पोलिसांकडून किंवा पोलीस कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला अडवलंय का? अचानक तुम्हालाच का थांबवलं जातं असा प्रश्न अशावेळी तुम्हालाही पडतो. अशावेळी तुम्हाला सर्वात आधी लायसन्स मागितलं जातं. मात्र ते दिल्यानंतरही काही वेळी तुमच्यावर कारवाई केली जाते. पण ती का होते हे जाणून घेऊया...

Mar 06, 2023, 18:28 PM IST

वाहतूक नियमांचे कोणतंही उल्लंघन न करता तुम्ही जात असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला थांबवलं जातं. तर यामागे कारणही तसेच आहे. हेल्मेट घातलं नसेल, बाईकमध्ये काही बदल केले असतील तर पोलीस तुम्हाला हमखास थांबवतात.

1/6

helmet

विना हेल्मेट प्रवास -  बाईक किंवा स्कूटरवर विना हेल्मेट तुम्ही प्रवास करत असाल तर पोलीस तुम्हाला थांबवतील. काही दिवासांपूर्वी बाईकवर प्रवास करणाऱ्या सहप्रवास करणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली होती

2/6

Without helmet

त्यामुळे जर तुम्ही विना हेल्मेट प्रवास केला तर 1 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो

3/6

bike modification

बेकायदेशीर बदल - कंपनी किंवा विक्रेत्याकडून बाईक खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही अशाप्रकारचे बदल केले तर पोलीस तुम्हाला थांबवू शकतात

4/6

facny number plate

नंबर प्लेट - जर तुम्ही तुमच्या नंबर प्लेटमध्येही कोणतेही चुकीचे बदल केले तर पोलीस तुम्हाला थांबवू शकतात आणि कारवाई करु शकतात.

5/6

number plate

काही जण विना नंबर प्लेट तर काही तिच्या आकारामध्ये बदल करुन सर्रास फिरत असतात. त्यामुळे पोलीस त्यांना थांबवून दंड आकारतात.

6/6

bike overload

क्षमतेपेक्षा जास्त वजन - जर तुम्ही बाईकवर क्षमतेपेक्षा जास्त वजन घेऊन फिरत असाल तर पोलीस नक्कीच तुम्हाला अडवतील. बाइकवर दोन पेक्षा जास्त व्यक्ती बसवून प्रवास करणे नियमांच्या विरोधात आणि धोकादायक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस तुम्हाला दंड आकारु शकतात. (फोटो सौजन्य - Reuters)