India Vs West Indies 1st ODI: या 5 खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय चाहत्यांचं असेल विशेष लक्ष; कारण...

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस पावसामुळे वाया गेल्याने कसोटी अनिर्णित राहूनही भारताने मालिका जिंकली. आजपासून म्हणजेच 27 जुलैंपासून भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पाहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूंकडे विशेष लक्ष असणार आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Jul 27, 2023, 13:15 PM IST
1/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज बार्बाडोस येथील ब्रिजटाऊनमधील किंग्सटन ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या मालिकेत 5 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. या 5 खेळाडूंना वैयक्तिक दृष्ट्याही ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. याचबद्दल जाणून घेऊयात..

2/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

सूर्यकुमार यादव - सूर्यकुमार यादवला भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरु शकते. त्याच्या फलंदाजाची अनोखी शैली ही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी चिंतेचं कारण ठरु शकते.

3/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

सूर्यकुमार यादवला टी-20 मध्ये चांगलं यश मिळालं असलं तरी एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये त्याने कामगिरी सुधारण्याची गरज आहे. श्रेयस अय्यरच्या जागी सूर्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते असं सांगितलं जात आहे.

4/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

हार्दिक पंड्या - भारतीय टी-20 संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पंड्या त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरच सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवू शकतो. त्याचं चेंडूवरील नियंत्रण वेस्ट इंडिजमध्ये निर्णयाक ठरेल असं सांगितलं जात आहे.

5/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पंड्याची अष्टपैलू कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पंड्याची फलंदाजीची शैलीही भारतीय संघासाठी धावांचा डोंगर उभा करताना किंवा पाठलाग करताना महत्त्वाची ठरणार आहे.

6/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

मोहम्मद सिराज - भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजकडे असेल. सिराजच भारताचा मुख्य गोलंदाज असेल यात शंका नाही. मागील काही पाळापासून सिराज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

7/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

उसळी घेणारे चेंडू, वेगवान चेंडू, इन स्विंग, आऊट स्विंग असे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू सिराज उत्तमपणे टाकू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात यजमानांचा अर्धा संघ एकट्या सिराजनेच तंबूत पाठवला. त्यामुळे आता तो एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

8/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

युजवेंद्र चहल - भारताच्या आघाडीच्या फिरकीपटूंमध्ये समावेश असलेल्या युजवेंद्र चहलच्या कामगिरीकडेही या मालिकेमध्ये विशेष लक्ष असेल. आर. अश्वीन मागील बऱ्याच काळापासून एकदिवसीय क्रिकेटपासून दूर असल्याने फिरकीची मुख्य जबाबदारी युजवेंद्र चहलच्या खांद्यावरच असेल.

9/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना युजवेंद्र चहल आपल्या फिरकीत सहज गुंडाळू शकतो. फिरणाऱ्या चेंडूचा वेग नियंत्रित करण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार गोलंदाजी हे युजवेंद्र चहलच्या सर्वात मोठ्या सकारात्मक बाबी आहेत. एकदिवसीय वर्ल्डकपच्या दृष्टीने चहलला संघात जागा मिळवण्यासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

10/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

विराट कोहली- भारतीय फलंदाजीचा कणा अशी ओळख असलेल्या विराट कोहलीने कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावलं. विराट हा सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याचा संघाला फायदा होईल.

11/11

Top 5 players to watch out for in India Vs West Indies in 1st ODI

विराट कोहली वेस्ट इंडिजमध्ये उत्तम फंलदाजी करत असून तो एकट्याच्या जीवावर सामना फिरवू शकतो. विराट या मालिकेमध्ये आपल्या शतकांचा आकडा वाढवेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.