International Cricket: सर्वाधिक क्रिकेट सामने खेळणाऱ्या जगातील ५ दिग्गज खेळाडूंची यादी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जगातील ५ दिग्गज खेळाडूंची यादी

| Jun 30, 2023, 15:32 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जगातील ५ दिग्गज खेळाडूंची यादी

1/6

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जगातील ५ दिग्गज खेळाडूंची यादी

Top 5 Cricketers who played the most matches in international level

सध्या जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर वर्ल्डकपचा फिव्हर आहे. जिकडे पाहू तिकडे क्रिकेटची चर्चा सुरु आहे. दरम्यान आपण देखील अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेऊया. सर्वाधिक कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडुंची यादी तुम्हाला माहिती आहे का? ते खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊया

2/6

सचिन तेंडुलकर

Top 5 Cricketers who played the most matches in international level

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सचिनच्या नावावर एकूण 34357 धावा आहेत.

3/6

महेला जयवर्धने

Top 5 Cricketers who played the most matches in international level

श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने एकूण 652 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात 149 कसोटी, 448 एकदिवसीय आणि 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आहेत. त्याच्या नावावर एकूण 25957 धावा आहेत.

4/6

कुमार संगकारा

Top 5 Cricketers who played the most matches in international level

कुमार संगकाराने एकूण 594 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात 134 कसोटी, 404 एकदिवसीय आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आहेत. त्याच्या नावावर एकूण 28016 धावा आहेत.

5/6

सनथ जयसूर्या

Top 5 Cricketers who played the most matches in international level

श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने एकूण 586 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात 110 कसोटी, 445 एकदिवसीय आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर एकूण 21032 धावा आणि 440 विकेट आहेत.

6/6

रिकी पाँटिंग

Top 5 Cricketers who played the most matches in international level

ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने एकूण 560 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर एकूण 27483 धावा आहेत.