लग्नानंतरचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी घ्या ही 12 वचने, एक्सपर्टने सांगितल्या Healthy Relationship टिप्स

Relationship Tips :  कोणतंच नातं खूप दिवस टिकून राहण्यासाठी त्या नात्यात काही महत्त्वाची मुल्ये असणे गरजेचे असते. मानसशास्त्रज्ञ नेहा रेगे-भाटवडेकर यांनी सांगितल्या टिप्स. 

| Mar 21, 2024, 11:54 AM IST

12 Points For Best Relationship :  नात्यामध्ये फक्त प्रेम असून चालत नाही. कारण नातं टिकवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण नातं निर्माण करणं जितकं सोपं आहे. तितकंच ते टिकवणे कठीण आहे. लग्नानंतर काही वर्षांनी नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचं पाहण्यात येत आहे. यामागे काय कारणे असू शकतात यावर विचार करणे आवश्यक आहे. अशावेळी मानसशास्त्रज्ञ आणि थेरपिस्ट नेहा रेगे - भाटवडेकर यांनी हेल्दी रिलेशनशिपकरिता 12 महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यामुळे तुमचं नातं होईल अधिक घट्ट. 

1/12

सहानुभूती

healthy relationships tips

कोणतंही नातं असू दे ते टिकवण्यासाठी सहानुभूतीची गरज असते. कारण तुमचं नातं घट्ट होण्यासाठी या गुणांचा समावेश असणे गरजेचे आहे. जोडीदाराबाबत सहानुभूती अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन विचार करता तेव्हा त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा अंदाज येतो. 

2/12

गरजा समजून घ्या

healthy relationships tips

नाते संबंध अधिक घट्ट टिकण्यासाठी कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांची गरज ओळखणे गरजेची आहे. नात्यामध्ये आपली आणि एकमेकांची गरज काय आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण अनेकदा एकमेकांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा दुःखांचं कारण ठरतं. 

3/12

पुढाकार घ्या जबाबदारी घ्या

healthy relationships tips

नातं टिकवत असताना बरेचदा एकमेकांना दोष देणं घडतं. हे न करता कोणत्याही कामात स्वतःहून पुढाकार घ्या आणि जबाबदारी स्वीकारा. कारण यामुळे तुमच्यातील वाद टाळले जाणार आहेत. अश्यावेळी वेळप्रसंगी पुढाकार घेऊन स्वतःला जबाबदार ठरवा आणि संवाद सादा. 

4/12

Me Time ची गरज

healthy relationships tips

नातं कितीही घट्ट असलं तरीही त्याला देखील मोकळा श्वास घ्यायला लागतो. अगदी तसंच नातेसंबंध टिकवताना एकमेकांना स्पेस देणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण नात्यामध्ये थोडा मी टाईम असणे अत्यंत गरजेचे आहे. नातं दोघांचं असलं तरीही एक व्यक्तिगत आयुष्य देखील तितकंच महत्त्वाचं असतं.   

5/12

संवाद महत्त्वाचा

healthy relationships tips

नात्यामध्ये कायमच संवाद महत्त्वाचा आहे. पण तो संवाद योग्यवेळी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेकदा नातं टिकवताना काही गोष्टी एकमेकांच्या आवडत नाहीत अशावेळी त्या तेव्हाच्या तेव्हा बोलणे गरजेचे आहे. त्यामुळे संवाद सोपा होतो कायम.

6/12

प्रेमाची भाषा समजून घ्या

healthy relationships tips

प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. तसेच प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. कुणी शब्दात आपलं प्रेम व्यक्त करतं तर कुणी कृतीतून. अशावेळी एकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण जेव्हा आपण ही भाषा समजून घेतो तेव्हा एकमेकांबद्दलच प्रेम आणि आदर दोन्ही वाढतो. 

7/12

चांगला श्रोता व्हा

healthy relationships tips

अनेकदा आपण ऐकणं विसरतो कारण बोलणं इतकं महत्त्वाचं होऊन जातो. प्रत्येकाला बोलायचं असतं. पण ऐकायचं कुणालाच नसतं. अशावेळी ऐकण्याचे खूप फायदे आहेत. कारण ऐकल्याने तुमच्या मनातील असंख्य प्रश्न दूर होतात. ऐकण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि त्याचे विचार अधिक स्पष्टपणे कळतात. 

8/12

वेगळेपणाचा आदर करा

healthy relationships tips

नातं फार जुनं असलं तरीही एकमेकांमध्ये काही ना काही वेगळेपण असते. या नात्यातील वेगळेपणाचा नक्की आदर करा. तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये असलेल्या त्या बदलाचा देखील तितकाच आदर करा. कारण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला या बदलासह स्वीकाराल तेव्हा नातं अधिक घट्ट होईल भांडण कमी होतील. 

9/12

कठीण काळात एकत्र राहा

healthy relationships tips

नात्यात प्रेम महत्त्वाचं आहे. पण यापेक्षा कणभर जास्त एकमेकांसाठी संवाद महत्त्वाच आहे. कठीण काळात एकमेकांना दिलेली साथ खूप गरजेची असते. तुमचं नातं टिकवण्यासाठी कठीण काळात एकमेकांना दिलेली साथ खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. 

10/12

माफी मागा पण वेळेत

healthy relationships tips

एकमेकांसोबत राहत असताना वाद होऊ शकतात. तसेच एकमेकांचं चुकूही शिकतं. पण अशावेळी तुम्ही माफी मागताना देखील ती तितकीच महत्त्वाची आहे. वेळेत माफी मागणे हेल्दी नात्याचे लक्षण असते. कारण माफी मागून एखादा विषय तेव्हाच्या तेव्हा संपवणे गरजेचे असते.   

11/12

विशेष वेळ विशेष व्यक्तीसाठी

healthy relationships tips

आताचं नातं हे स्पर्शापेक्षा व्हॉट्सऍपवर अधिक व्यक्त होतं. कारण दोघंही कामात, करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही. अशावेळी स्पर्श दूरच राहतो. त्यामुळे ठरवून एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. ठरवून एखादा विकेंड बाहेर फिरायला जा किंवा एकत्र स्वयंपाक तयार करा. 

12/12

आनंद साजरा करा

healthy relationships tips

एकमेकांनी एकमेकांसोबत आनंद साजरा करणं हे देखील नातं घट्ट करण्यासाठी उपयोगी ठरतं. कारण दुःखात एकमेकांना जशी साथ दिली जाते अगदी त्याचप्रमाणे आनंदाच्या क्षण देखील एकत्र साजरे करा.