Ravan Dahan Places in India: एकदातरी बघावा असा रावण दहन सोहळा, 'ही' आहेत 10 प्रसिद्ध ठिकाणं

Popular Ravan Dahan Places in India: 12 ऑक्टोबरला सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. भारतात अनेक ठिकाणी दसऱ्याला रावण दहन केले जाते. भारतात फार पूर्वीपासून विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तीचा नाश असा संदेश देत देशभर रावण दहन केले जाते. चला जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध रावण दहन.

Oct 09, 2024, 10:31 AM IST
1/10

1. दिल्ली:

दसरा उत्सव पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे दिल्लीतील लाल किल्ला. रावण दहन हे या ठिकाणचे मुख्य आकर्षण मानले जाते. या ठिकाणी रावणासोबत मेघनाद आणि कुंभकरण यांच्याही पुतळ्यांचे दहन केले जाते. जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

2/10

2. म्हैसूर:

कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस येथील भव्यदिव्य रावण दहनाचा सोहळा पाहण्यासारखा असतो. यावेळी संपूर्ण म्हैसूर पॅलेस हजारो दिव्यांनी उजळून निघालेला असतो. 

3/10

3. अयोध्या:

अयोध्या हे भगवान रामांचे जन्मस्थान मानले जात असल्याने येथे दसरा थाटामाटात साजरा केला जातो. रावण दहन हा अयोध्येतील रामलीला कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 

4/10

4. वाराणसी:

वाराणसीमध्ये भगवान रामाच्या जीवनाचे नाट्यमय चित्रण केले जाते. ज्यात रावण दहन हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. गंगेच्या काठावरील यावेळचे दृष्य पाहण्यासारखे असते. 

5/10

5. चंदीगड :

चंदिगडमध्येही दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील रावण दहन उत्सवासोबतच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. 

6/10

6. जयपूर:

राजस्थानची राजधानी जयपूरमधील विद्याधर नगर स्टेडियम हे रावण दहन पाहण्याचे प्रमुख ठिकाण आहे. मिरवणुका, संगीत आणि नृत्य सादरीकरणामुळे या सोहळ्याला अजून शोभा येते. 

7/10

7. श्री राम भारतीय कला केंद्र

रावण दहनासाठी प्रसिद्ध असलेले दिल्लीतले अजून एक ठिकाण म्हणजे श्री राम भारतीय कला केंद्र. गेल्या 62 वर्षांपासून येथे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. इथे रावण दहना सोबतच रामलीलाही सादर केली जाते.

8/10

8. नागपूर

नागपूरमधील कस्तुरचंद पार्क हे रावण दहन पाहण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. जिथे रावणाचा मोठा पुतळा जाळला जातो.

9/10

9. पुणे

पुण्यातील पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक हे रावण दहन पाहण्याचे लोकप्रिय ठिकाण आहे. मोठ्या उत्साहात इथे हा सोहळा साजरा केला जातो. 

10/10

10. मुंबई:

मुंबईतील रावण दहन पाहण्यासाठी काही प्रमुख ठिकाणे आहेत. जसे की आझाद मैदान, मालाडमधील छत्रपती शिवाजी राजे स्पोर्ट्स ग्राउंड, गिरगाव चौपाटी, काळबादेवीचे साहित्य कला मंच या ठिकाणचा रावण दहन सोहळा पाहण्या सारखा असतो.