आयुष्याला कंटाळलेल्या प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवेत 'हे' बॉलीवूड चित्रपट

List of Motivational Bollywood Movies: डिप्रेशन हे आजच्या तरुण पिढीमधील सर्वात मोठा गंभीर आजार असल्याचं wHO ने वारंवार जाहीर केलं. डिप्रेशनला बळी न पडता आपलं आयुष्य आनंदात जगायला हवं हे जाणवतं पण तशी कृती घडत नाही. बॉलिवूडचे हे सिनेमे तुम्हाला आयुष्याकडे  सकारात्मक नजरेने पाहायला भाग पाडतात. 

Jun 18, 2024, 11:10 AM IST
1/7

जब वी मेट

सगळं काही मनाविरुद्ध घडायला लागलं की,माणसं नैराश्यात जातात. पण काही गोष्टी या मनाविरुद्ध घडतात कारण पुढे जाऊन आपलं काहीतरी छान होणार असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'जब वी मेट'. गीतची ट्रेन चुकली म्हणून तिची आदित्यशी भेट झाली. किती ही संकट आली तरी गीतसारखं 'मैं अपनी फेवरेट हूं' असं म्हणता यायला हवं.   

2/7

ये जवानी है दिवानी

आजूबाजूच्या परिस्थितीमुळे बऱ्याचदा आपण स्वत: वरचा विश्वास हरवून बसतो. कठीण प्रसंग आयुष्यात येतात म्हणून जगणं सोडून देणं हा पर्याय होत नाही,हे सांगणारा सिनेमा म्हणजे 'ये जवानी है दिवानी'. स्वत:ला कमी समजणाऱ्या नयनाला जेव्हा बनी म्हणतो की, 'खुद पे तरस खाना बंद कर दो और खुदसे प्यार करना सिखो, तुम जैसी हो बिल्कुल ठिक ठाक हो' बनीचा हा डायलॉग स्वत:ला आहे तसं स्विकारता यायला हवं हे सांगतो. 

3/7

डियर जिंदगी

बऱ्याचदा रिलेशिपमध्ये आपण आपल्याकडून पूर्णपणे प्रामाणिक असतो पण असं असूनही ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते आणि आता आपल्या आयुष्यात काहीच चांगल होणार नाही असं वाटायला लागतं. त्रास देणाऱ्या आठवणी मनात ठेऊन आपण जगत असतो. 'हर टूटी हुई चिज जुड सकती है' 'डियर जिंदगी'मध्ये आलिया आणि शाहरुखमधला हा संवाद खूप काही सांगून जातो. आपल्याला मिळालेलं आयुष्य किती सुंदर आहे, हे सांगणारा हा सिनेमा एकदातरी पाहायलाच पाहिजे.   

4/7

हंपी

ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या 'हंपी' सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आयुष्यात आलेली सगळीच माणसं आपला फक्त गैरफायदाच घेऊ शकतो. असं वाटणाऱ्या इशाला जेव्हा कबीर भेटतो तेव्हा तिचा या जगात चांगली माणसं सुद्धा असताता यावर विश्वास बसतो. 'हंपी'मधल्या बुद्धांच्या लेण्या आणि  जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, या सगळ्या गोष्टी हंपी सिनेमातून आपल्या पर्यंत पोहोचतात.    

5/7

स्माईल प्लीज

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे हीचा स्माईल प्लीज सिनेमा आयुष्याला हरलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्माईल प्लीज म्हणतो.काल काय घडलं आणि उद्या काय होणार , या विचारात अडकलो असताना आपण आजचा आनंद विसरतो. आजमध्ये असलेले क्षण हे भरभरुन जगण्यात आयुष्य जगणं आहे, हे पटवून सांगणारा सिनेमा म्हणजे 'स्माईल प्लीज'.   

6/7

क्वीन

माणसं आयुष्यात येतात आणि जातात. मात्र जेव्हा आपलं कोणी सोडून जातं तेव्हा माणूस स्वत:बद्दल नकारात्मक विचार करतो. जेव्हा भर मांडवात लग्न मोडतं तेव्हा 'राणी' एकटीच परदेशात फिरायला जाते. त्यावेळी तिला अनेक जण भेटतात आणि आयुष्याला सेकंड चान्स द्यायला हवं हे सांगणारा कंगनाचा सिनेमा तुम्हाला नव्याने स्वत:वर प्रेम करावं याची जाणिव करुन देतो.  

7/7

झिम्मा

रोजच्या आयुष्यातल्या समस्यांमध्ये माणूस स्वत:ला हरवून बसतो. जुनं सोडून नवीन स्विकारता यायला हवं, त्यासाठी बाहेर फिरणं गरजेचं आहे. प्रवासात माणूस जुन्याचा नवीन होतो. आपल्या स्वत: आपला विश्वास असणं  फार महत्त्वाचं आहे.याची जाणिव 'झिम्मा' सिनेमा करुन देतो.