Toothache : दातदुखीवर घरच्या घरी करा 'हे' साधे आणि सोपे उपाय!

Toothache : दातदुखीमागे अनेक कारणं असू शकतात. कधीकधी कडक पदार्थ किंवा गरम खाल्लं की अचानक दातामध्ये वेदना होतात. दातदुखीच्या त्रासाने जेवताना देखील त्रास जाणवतो. 

Jul 06, 2023, 14:07 PM IST
1/5

दरम्यान काही घरगुती उपायांनी दातदुखीच्या त्रासपासून मुक्त होऊ शकता. 

2/5

पुदीनाचा वापर दातदुखी तसंच हिरड्यांची जळजळ कमी करतं. संवेदनशील हिरड्या शांत करण्यासही पुदीन्याची मदत होते.

3/5

दातांच्या समस्येवर मीठाच्या पाण्याने गुळण्या करणं हा एक उपाय मानला जातो. यामध्ये तुम्ही कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळा आणि ते माऊथ वॉश म्हणून वापरू शकता.

4/5

दातांच्या दुखण्यावर एक उत्तम आणि जुना वापरला जाणारा उपाय म्हणजे लवंग. लवंग केवळ वेदना कमी करत नाही तर सूज देखील कमी करण्यास मदत करते. 

5/5

लसणीमध्ये असलेले बॅक्टेरिया विरोधात गुणधर्म असतात. यावेळी दात दुखत असलेल्या ठिकाणी लसूण पेस्ट देखील लावू शकता.