Tiger Shroff : माझी एकच दिशा...! रिलेशनशिपच्या स्टेटसवर टायगर श्रॉफने अखेर सोडलं मौन, म्हणतो...

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Saurabh Talekar | Apr 08, 2024, 21:19 PM IST

Tiger Shroff  relationship status : टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

1/7

टायगर श्रॉफ

सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच आता एका मुलाखतीत जेव्हा टायगरला रिलेशनशिपच्या स्टेटसवर प्रश्न विचारला तेव्हा त्याने काय उत्तर दिलं पाहा...

2/7

सिंगल आहेस का?

टायगर तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य कोणत्या 'दिशा'ला जातंय? असा प्रश्न टायगर श्रॉफला विचारला गेला. टायगरने देखील प्रश्नाचा रोख समजला अन् उत्तर दिलं.

3/7

एकच दिशा

माझ्या आयुष्यात एकच दिशा आहे. हो आणि ते आहे माझं काम, असं टायगर श्रॉफने हसत म्हटलं. त्यावर अक्षय कुमारने टायगरला सल्ला दिला.

4/7

अक्षयचा सल्ला

शब्दांचा खेळ सुरू असताना जेव्हा, अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, तू टायगर श्रॉफला कोणता सल्ला देशील? यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.

5/7

अक्षय म्हणतो...

त्यावेळी, मी टायगरला एवढंच सांगेन की एकाच दिशेवर लक्ष केंद्रित कर, असा भन्नाट उत्तर अक्षयने दिलं. त्यानंतर मुलाखतीत हशा पिकला.

6/7

अफवा

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी एकमेकांना डेट करीत असल्याच्या अफवा गेल्या काही वर्षांपासून कानावर येत आहेत. 

7/7

ब्रेकअप झालाय?

2023 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी दोघांचं ब्रेकअप झालाय, अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र, दोघांनी त्यांनी वाभळ्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.