ऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?

Oily Skin​ People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.

| Jun 02, 2023, 15:36 PM IST
1/6

कधीकधी हार्मोन्स, वातावरण इत्यादींमुळे आपली त्वचा खराब होते. आज आपण कोणत्या सवयींनी त्वचेची काळजी घेऊ शकतो ते सांगणार आहोत. आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, तरच तेलकट त्वचेची समस्या कमी होऊ शकते.

2/6

दूध, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ आपल्या त्वचेसाठी चांगले असले, तरी दुग्धजन्य पदार्थांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते आणि मुरुमे सुरू होतात. म्हणून, जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांऐवजी बदामाचे दूध किंवा सोया दूध पिऊ शकता.

3/6

अल्कोहोलचे सेवन करत असाल तर ते लगेच सोडा. अल्कोहोल आपल्या त्वचेसाठी चांगले नाही. अल्कोहोल प्यायल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचे नुकसान भरुन निघण्यास वेळ लागतो. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल आणि तुम्ही अल्कोहोल पिणे टाळा.

4/6

फ्रेंच फ्राईज, समोसे आणि चिप्स यांसारख्या मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ यामध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. तळलेले अन्न त्वचेसाठी हानिकारक आहे. जास्त तेलाचे सेवन केल्याने त्वचेवर पिंपल्स येतात. 

5/6

मीठ खाण्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने आपली त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी  मीठ कमी खा.

6/6

तुमची त्वचा तेलकट असेल तर गोड पदार्थ खाण्याचे टाळावे. मिठाई खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच पण इतरही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ते त्वचेसाठीही वाईट आहे. जास्त साखर असलेल्या आहारामुळे शरीरात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)