अर्पिता-आयुषच्या नात्यावर सलमानची अशी होती प्रतिक्रिया

एखाद्या चित्रपटातील कथे प्रमाणेच यांची प्रेमकथा आहे. 

Nov 19, 2020, 12:03 PM IST

अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा आणि अभिनेता आयुष शर्मा यांच्या लग्नाला आज ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. एखाद्या चित्रपटातील कथे प्रमाणेच यांची प्रेमकथा आहे. 

 

1/5

लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात अर्पिताने सोशल मीडियावर तिचा आणि पती आयुष शर्माचा फोटो शेअर केला आहे. अर्पिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खान देखील दिसत आहे.  

2/5

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मित्र ते पती हा जो आपला प्रवास आहे, तो माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. मी आपल्या जुन्या आठवणी कायम सांभाळून ठेवेल. मला आनंद या गोष्टीचा आहे की ६ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना निवडलं आहे.' असं लिहिलं आहे.   

3/5

आयुषने देखील अर्पिताला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

4/5

आयुष आणि सलमान खान लवकरच 'अंतिम' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर आहे.   

5/5

अर्पिताने 'लवयात्री' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आयुषची ओळख कुटुंबीयांसोबत करून दिली होती. त्यांच्या नात्यासंबंधी बोलताना सलमान म्हणाला की, त्यावेळी आम्ही  'माय पंजाबी निकाह' चित्रपटाच्या कामात व्यस्त होतो. आम्ही एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होतो. १ महिन्यानंतर सोहेल मला म्हणाला की जिममध्ये एक मुलगा येतो जो चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य आहे. मात्र त्यानंतर तिन महिने तो मुलगा दिसला नाही. त्यानंतर आर्पिताने आयुषशी ओळख करून दिली आणि या मुलासोबत लग्न करायचं आहे असं सांगितलं. तेव्हा सोहेलने सांगितले की हा तोच मुलगा आहे, ज्याच्यासोबत मला चित्रपटामध्ये काम करायचं होतं. अशाप्रकारे सलमान आणि आयुषची ओळख झाली.