महाराष्ट्रातील एकमेक मंदिर जे तब्बल 8 महिने धरणाखाली बुडालेले असते; फक्त 4 होते महादेवाचे दर्शन

महाराष्ट्रातील हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. 

वनिता कांबळे | Apr 07, 2024, 18:58 PM IST

Pune Wagheshwar Temple : महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहेत. असचं एक अनोखं मंदिर पुणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर वर्षातील 8 महिने पाण्याखाली असते. हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे.

1/7

महाराष्ट्रात एक असं अनोखं मंदिर आहे जे वर्षातील 8 महिने धरणाखाली बुडालेले असते. वर्षातून फक्त 4 महिनेच महादेवाचे दर्शन होते. 

2/7

या मंदिराचा थेट छत्रपती शिवरायांशीही संबध आहे. महाराजांनी कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर ते वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.   

3/7

 वाघेश्वर मंदिर  700 ते 800 वर्ष जुनं आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. 

4/7

पावसाळा आणि त्यांनतरचे काही महिने असं मिळून हे मंदिर 8 महिने पाण्याखाली असते. साधारण मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येते.

5/7

1965 मध्ये पावना धरण बांधण्यात आले. 191 मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली. यानंतर हे मंदिर पाण्याखाली बुडाले. 

6/7

पवना धरणाच्या पाण्यात असलेले वाघेश्वर  मंदिर तब्बल 8 महिले पाण्याखाली असते. वर्षातून फक्त 4 महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते.  

7/7

पुण्यातील वाघोली येथे हे वाघेश्वर मंदिर आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविक प्रतिक्षा करत असतात.