PHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड

IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद  (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.

| Mar 28, 2024, 11:11 AM IST
1/7

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर आज धावांचा अक्षरशा पाऊस पडला. सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अक्षरश: धू धू धुतलं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायजर्सने नोंदवला. 3 विकेटच्या मोबदल्यात हैदराबादने 277 धावा केल्या.

2/7

या सामन्यात सलामीलाला आलेल्या ट्रेव्हिस हेडने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकत नवा विक्रम रचला. याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर हा विक्रम होता. वॉर्नरने 20 चेंडूत अर्धशतक केलं होतं. हेडने अवघ्या 24 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.

3/7

पण ट्रेव्हिस हेडचा हा विक्रम काही मिनिटचं टिकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अभिषक शर्माने आयपीएलचे सर्व विक्रम मोडित काढले. अभिषेकने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई करत तब्बल षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. 

4/7

अभिषेकने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. अभिषेकने 63 धावांची खेळी केली. यात त्याने 7 षटकार आणि 3 चौकार लगावले. अभिषेकच्या फलंदाजीच्या जोरावर सनरायजर्सने सामन्याच्या दहाव्या षटकातच दीडशे धावांचा पल्ला गाठला होता. 

5/7

अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक करणारा अभिषेक शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. वेगवान अर्धशतकाच्या यादीत अभिषेक शर्मानंतर, ट्रेव्हिस हेड (18 चेंडू), डेव्हिड वॉर्नर (20 चेंडू) आणि मोईजेस हेनरिक्स (20 चेंडू) यांचा नंबर लागतो.

6/7

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडशिवाय एडेन मारक्रम आणि हेन्रिक क्लासेननेही तुफान फटकेबाजी केली. क्लासेनने अवघ्या 34 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. यात त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर मारक्रमने 28 चेंडूत 42 धावा केल्या.

7/7

या सामन्यात सनराजयर्स हैदराबादने अनेक विक्रम रचले. 7 व्या षटकात हैदराबादने 100 धावांचा टप्पा गाठला. तर 14.4 षटकात 200 धावांचा टप्पा गाठला. सनरायजर्सच्या फलंदाजांनी या सामन्यात तब्बल 18 षटकार लगावले. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीच्या नावावर 263 धावांचा विक्रम होता. तो विक्रमही आता मागे पडलाय.