घटस्फोटानंतर 3.5 कोटींचं कर्ज, रस्त्यावर आलेली 'ही' अभिनेत्री; प्लास्टिकच्या पिशवीतून जेवायची वेळ

छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनं काही काळातच खुलासा केला की जेव्हा तिला चार दिवसांसाठी घरातून बाहेर पडली होती तेव्हा तिच्यावर 3.5 कोटींचं कर्ज होतं आणि ती रस्त्यावर आली होती. त्यावेळी ती अशा काही वाईट परिस्थितीतून गेली होती की तिनं पिशवीत मिळणारं 20 रुपयात येणारं जेवणं केलं. 

| Jul 31, 2024, 17:23 PM IST
1/7

रश्मि देसाईनं चित्रपट, छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब शो या तिन्ही पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कठीण काळाविषयी खुलासा केला. तिनं सांगितलं की जेव्हा ती बेघर झाली होती. तेव्हा तिची परिस्थिती कशी झाली होती. 

2/7

यूट्यूब चॅनलवर पारस छाबडासोबत एक पॉडकास्ट दरम्यान रश्मि देसाईनं ही सगळी परिस्थिती सांगितली. नंदीश संधूसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिच्यावर 3.5 कोटींचं कर्ज झालं होतं. ज्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या दरम्यानच ती बेघर झाली होती आणि तिला तिच्या गाडीतच झोपावं लागलं होतं. 

3/7

रश्मि यावेळी म्हणाली की '2017 एक असा काळा होता, जेव्हा मला कुटुंबाशी संबंधीत काही अडचणींचा सामना करावा लागत होतो. आर्थिक रित्या माझी खूप बिकट परिस्थिती झाली होती. माझ्यावर कोटींचं कर्ज होतं. मला कळतं नव्हतं की माझ्यावर असलेलं हे कर्ज मी कसं फेडेन. तेव्हाच मला 'दिल से दिल तक' या शोची ऑफर मिळाली. या शोचा संपूर्ण प्रवास हा माझ्यासाठी खूप सुंदर होता.'

4/7

रश्मि पुढे म्हणाली,'मी त्यावेळी एक घर खरेदी केलं होतं. मी जवळपास 2.5 कोटींचं लोन घेतलं होतं. त्याशिवाय माझ्यावर एकूण 3.5 कोटींचं कर्ज होतं. मला वाटत होतं की सगळं काही ठीक होईल, पण तेव्हाच माझा शो बंद पडला. मी चार दिवस रस्त्यावर देखील आले. माझ्याकडे एक ऑडी A6 होती आणि मी त्याच गाडीत झोपायचेय माझं सगळं सामान मी माझ्या मॅनेजरच्या घरी ठेवलं होतं. माझ्या संपूर्ण कुटुंबापासून मी दुरावले होते.'

5/7

रश्मि पुढे म्हणाली, 'त्यावेळी रिक्षा चालकांना 20 रुपयातं जेवाण मिळायचं. हे जेवण एका प्लास्टिकच्या पिशवीत यायचंय ज्यात डाळ आणि भात मिक्स असायचं आणि त्यासोबत ते दोन चपाती देखील द्यायचे. त्यात अनेकदा खडा देखील असायचे, पण तरी सुद्धा मी ते जेवायचे. ते चार दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते.' 

6/7

रश्मि देसाईनं पुढे सांगितलं की 'माझा घटस्फोट झाला, इतकंच नाही तर, माझे मित्र देखील विचार करू लागले की मी खूप वेगळी आहे. कारण मी कधीच माझ्या भावना सगळ्यांसमोर मांडल्या नाही आणि मी माझ्या लिमिट्समध्ये रहायचे. माझ्या कुटुंबातील लोकांना वाटलं की मी सगळे निर्णय चुकीटे घेतले. मी कसं तरी माझं कर्ज फेडलं, पण मी अजूही खूप तनावात असते. मला झोप येत नाही. मी फक्त काम करत रहायचे. त्यावेळी मी स्वत: ला संपवण्याविषयी विचार करत होते.' 

7/7

रश्मिनं पुढे सांगितलं की 'मात्र, भविष्यात तिला जे काही मिळालं, ते ती लगेच तिच्या भविष्यासाठी ठेवायची. पण भविष्यासाठी बचत करण्याशिवाय देखील अनेक काम आहेत. मला माहित नव्हतं की माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याचा मी कसा वापर करायला हवा. हे मला कळत नाही.'  थोडक्यात मला कळत नव्हतं की मी पैसे कसे सांभाळायचे आणि भविष्यासाठी कशी तयारी करायची. हेच कारण होतं की स्वत: ला फायनॅनशिअली सिक्योर करणं कठीण झालं.