याला म्हणतात साधेपणा.. 1.10 लाख कोटींचा मालक पण मोबाईलही वापरत नाही! 6 लाखांच्या सॅण्ट्रोतून करतो प्रवास

Man Owns 1.10 Lakh Crore: सामान्यपणे संपत्ती आली म्हणजे आलिशान आयुष्य आणि महागड्या गोष्टी ओघाने आल्याच असं समजलं जातं. मात्र हे असं सरसकट असेल असं नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने शून्यातून 1.10 लाख कोटींचं सम्राज्य उभं केलं असूनही ती अगदी सर्वसामान्याप्रमाणे जगते. जाणून घेऊयात कोण आहे ही व्यक्ती आणि ती नेमकं काय करते याबद्दल...

| Aug 29, 2024, 16:00 PM IST
1/10

ramamurthythyagarajan

संपत्ती आली की आलिशान जीवनशैली आली असं मानलं जातं. मात्र आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत तो या गोष्टीला अपवाद आहे. 1.10 लाख कोटी रुपयांची कंपनीची स्थापना करणारी व्यक्ती छोट्याश्या घरात राहते, अवघ्या 6 लाखांची कार चालवते इतकेच काय त्याच्याकडे साधा मोबाईल फोनही नाही असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. भारतात असा एक उद्योगपती आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा उद्योगपती कोण? ते नक्की काय करतात हेच जाणून घेऊयात...

2/10

ramamurthythyagarajan

ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, राममूर्ती त्‍यागराजन! श्रीराम ग्रपची स्थापना करणारे राममूर्ती त्‍यागराजन यांनी 1960 मध्ये एका छोट्या कंपनीपासून सुरुवात केली होती.

3/10

ramamurthythyagarajan

चिट फंड कंपनी म्हणून राममूर्ती त्यागराज यांनी जी कंपनी सुरु केली होती ती आज 64 वर्षानंतर अर्थिक क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणून नावारुपास आली आहे.

4/10

ramamurthythyagarajan

आज श्रीराम फायनान्स कंपनीची किंमत 1.10 लाख कोटी रुपये इतकी आहे. मात्र राममूर्ती त्‍यागराजन यांनी एवढं यश मिळवलं कसं?  

5/10

ramamurthythyagarajan

आर्थिक क्षेत्रामध्ये राममूर्ती त्‍यागराजन यांनी निवडलेला आगळावेगळा दृष्टीकोन त्यांच्या यशसाठी कारणीभूत ठरला. राममूर्ती त्‍यागराजन यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका विमा कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून केली. मात्र पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या बँका या मोठ्या लोकसंख्येच्या गरजांकडे दूर्लक्ष करत असल्याचं राममूर्ती त्‍यागराजन यांना जाणवलं. 

6/10

ramamurthythyagarajan

बँका सामान्यपणे कर्ज नाकारतं अशा लोकांमध्ये ट्रक चालक आणि इतर अल्प उत्पन्न गटातील लोकांकडे बँका दूर्लक्ष करतात हे राममूर्ती त्‍यागराजन यांना प्रकार्षाने दिसून आलं. या लोकांना कर्ज उपलब्ध करुन देत त्यामधून काहीतरी वेगळं निर्माण करता येईल असं जाणवल्यानंतर राममूर्ती त्‍यागराजन या लोकांना कर्ज देऊ लागले.

7/10

ramamurthythyagarajan

खास करुन उद्योगांसाठी वाहने खरेदी करण्यासाठी राममूर्ती त्‍यागराजन कर्ज देऊ लागले. यापूर्वी मोठ्या कंपन्या आणि बँकांकडून दूर्लक्षित राहिलेल्या या मोठ्या घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पोकळी राममूर्ती त्‍यागराजन यांच्या कंपनीने भरुन काढली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

8/10

ramamurthythyagarajan

राममूर्ती त्‍यागराजन आज फार श्रीमंत आहेत. मात्र त्यांना त्यांची श्रीमंती दाखवायला आणि मिरवायला आवडत नाही. राममूर्ती त्‍यागराजन हे सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याला प्राधान्य देतात. राममूर्ती त्‍यागराजन आजही आलिशान गाडीमधून न फिरता 6 लाखांची सॅण्ट्रो कार वापरतात. ते आधुनिक तंत्रज्ञान वापरत नाहीत.  

9/10

ramamurthythyagarajan

राममूर्ती त्‍यागराजन यांना प्रकाशझोतापासून दूर राहायला आवडतं. त्यांनी त्याच्या वाट्याची 750 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 628 कोटींच वाटा कंपनीच्या ट्रस्टच्या नावे केला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.   

10/10

ramamurthythyagarajan

राममूर्ती त्‍यागराजन यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखरच यश हे आलिशान जीवनमान आणि आजूबाजूच्या उपभोग घेणाऱ्या वस्तूपुरते मर्यादित नसून आपल्या कामाचा इतरांच्या आयुष्यावर किती सकारात्मक परिणाम होतो यावर अवलंबून असल्याचं अधोरेखित करतो.