दिवसाची कमाई ₹220000000, कर्मचारी केवळ 1200! तरीही 'या' भारतीय कंपनीचा मालक टेन्शनमध्ये कारण...

₹220000000 Daily Revenue By Indian Company: भारतामधील या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 1200 इतकी आहे. मात्र असं असतानाही ही कंपनी दिवसाला 22 कोटी रुपये कमवते. ही माहिती कंपनीच्या सहसंस्थापकनाचे दिली आहे. ही कंपनी कोणती आहे? ती नेमकं करते तरी काय पाहूयात...

Swapnil Ghangale | Sep 29, 2024, 11:17 AM IST
1/11

profitind

ही भारतीय कंपनी दिवसाला 22 कोटी रुपये कमवते. कंपनीत अवघे 1200 कर्मचारी आहेत. असं असतानाही कंपनीचा मालक टेन्शनमध्ये आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण...

2/11

profitind

"यंदाच्या आर्थिक वर्षात आम्ही एकूण 8370 कोटी रुपये कमवले असून त्यापैकी 4700 कोटी रुपये हा निव्वळ नफा आहे," असं या भारतीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. वरील फोटोत याच कंपनीचं ऑफिस दिसत आहे.

3/11

profitind

विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीने सेल्सच्या माध्यमातून 6875 कोटी रुपये कमवले होते आणि त्यापैकी निव्वळ नफ्याची रक्कम होती 2907 कोटी रुपये! म्हणजेच एका वर्षात या कंपनीचा नफा जवळपास दीड पटींहून अधिकने वाढला आहे.

4/11

profitind

या कंपनीचा निव्वळ नफा 4700 कोटी रुपये इतका आहे. म्हणजेच ही कंपनी दिवसाला 22 कोटींचा नफा कमवते असं या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.  

5/11

profitind

आपण एवढा वेळ ज्या कंपनीच्या कमाईच्या आकड्यांबद्दल बोलतोय त्या कंपनीचं नाव आहे 'झिरोदा'! या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तो ब्लॉग लिहिणारी व्यक्ती आहे नितीन कामत! ही कंपनी शेअर बाजारासंदर्भातील क्षेत्रात असून ऑनलाइन माध्यमातून शेअर बाजारात पैसे गुंतवणारे अनेकजण या कंपनीच्या अॅपच्या माध्यमातून ट्रेडिंग करतात.  

6/11

profitind

'झिरोदा' ही कंपनी फारच उत्तम कामगिरी करत असून एकूण कमाईपैकी अर्धा पैसा हा नफा आहे. कामत यांच्या सांगण्यांनुसार 'झिरोदा' ही सर्वात सुरक्षित ब्रोकर कंपनी आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीच्या एकूण मुल्यापैकी 40 टक्के हे परदेशी क्लायंट्सचे पैसे आहेत.   

7/11

profitind

सध्या कंपनी चांगली कमाई करत असली तरी कामत यांनी कंपनीची कमाई लवकरच समान स्तरावर येईल आणि कंपनीचा नफा कमी होईल. यामागील मुख्य कारण म्हणजे भांडवली बाजार नियामक 'सेबी'ने जारी केलेल्या नव्या नियमांचा कंपनीला फटका बसण्याची शक्यता आहे. फ्री इक्विटी डिलेव्हरी सैद्यांसाठीचं व्हॉल्यूम बेस ट्रानझॅक्शन फी मॉडेल हद्दपार केलं जाणार असल्याचा फटका 'झिरोदा'बरोबरच अन्य ब्रोकर्सला बसणार आहे. 

8/11

profitind

'सेबी'चं हे 'ट्रू-टू-लेबल' मॉडेल 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळेच 'झिरोदा'च्या नफ्यामध्ये 10 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.   

9/11

profitind

निर्देशांक डेरिव्हेटिव्ह नियमांमध्ये बदल झाल्याचा फटका कंपनीला बसू शकतो. कारण हाच 'झिरोदा'च्या कमाईचा मुख्य स्रोत असून यामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये 30 ते 50 टक्के घट होईल असा कामत यांचा अंदाज आहे.

10/11

profitind

मात्र 'झिरोदा' कंपनीमध्ये केवळ 1200 कर्मचारी असल्याने त्यांच्यावरील खर्च तसेच पारंपारिक पद्धतीने होणारा कंपनीचा विस्तार आणि सध्या कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती याचा विचार केला तर हा संभाव्य आर्थिक फटका कंपनी पेलवू शकते असं सांगितलं जात आहे.  

11/11

profitind

सध्या 'झिरोदा'पेक्षा 'ग्रो'वर अधिक सक्रीय युझर्स आहेत. मात्र झिरोदाची बिझनेस स्ट्रॅटर्जी एवढी भक्कम आहे की त्यांना भरपूर नफा होतो.