बॉलिवूडचे 'हे' कलाकर धुळवडीपासून राहतात दोन हात दूर, कारण...

धुळवड हा सण सगळ्यांनाच आवडतो असं नाही. त्यातही बॉलिवूडची धुळवड ही सगळ्यात जास्त चर्चेत असते. अनेकदा सेलिब्रिटी हे मोठ्या पडद्यावर आपल्याला धुळवड खेळताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का काही कलाकार आहेत ज्यांना धुळवड खेळायला आवडत नाही. त्यांना रंगांनपासून लांब रहायला आवडतं. आता असे कोणते कलाकार आहेत ज्यांना धुळवड खेळायला आवडत नाही, चला तर त्यांच्या विषयी जाणून घेऊया...  

Diksha Patil | Mar 21, 2024, 18:54 PM IST
1/7

जॉन अब्राहम

अॅक्शनसाठी ओळखला जाणारा जॉन अब्राहमला होळी खेळायला मुळीच आवडत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला असं वाटतं की होळी खेळणं म्हणजे पाणी वाया घालणं आहे. इतकंच नाही तर ते रंग आपल्या निसर्गाला हाणी पोहोचवतात. 

2/7

रणबीर कपूर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरला होळी खेळायला आवडत नाही. त्याचं कारण म्हणजे 'बलम पिचकारी' या गाण्याच्या शूटिंगनंतर त्याला फार त्रास झाला. रिपोर्ट्सनुसार, त्याला होळीच्या रंगाचा त्रास होतो.

3/7

करण जोहर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर जेव्हा 10 वर्षांता होता तेव्हा होळीमध्ये कोणी रंग सांगून त्याच्यावर अंडी फोडली त्यामुळे घाबरून त्यानं होळी खेळणं बंद केलं. 

4/7

तापसी पन्नू

तापसी पन्नू देखील रंगांपासून लांब राहते. लहाण असताना तिला आवडत नव्हतं आणि आता तिला त्यासाठी वेळ नसतो.   

5/7

श्रुती हासन

श्रुती हासनला रंगांपासून लांब रहायला आवडतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचं असं म्हणणं आहे की होळी खेळणं म्हणजे पाणी वाया घालवणं आहे. 

6/7

रणवीर सिंग

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग हा एकदम स्टायलिश वगैरे दिसत असला तरी त्याला होळी खेळायला आवडत नाही. त्याला वाटतं की रंग आपल्या निसर्गावर खूप वाईट परिणाम करतात. 

7/7

करीना कपूर

करीना कपूरला होळी खेळायला आवडत नाही. बॉलिवूड लाइफनं दिलेल्या माहितीनुसार, राज कपूर यांच्या निधनानंतर करीनानं होळी खेळणं बंद केलं.