केस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी शॅम्पूत मिसळा हे पदार्थ!

Apr 26, 2018, 20:13 PM IST
1/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. केस मुलायम, घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल वापरता. तर अनेकदा घरगुती उपायही ट्राय करता. पण नेहमीच्या धावपळीत केसांकडे शक्य तितके लक्ष दिले जात नाही. पण अशा काही सोप्या टिप्स ज्यासाठी तुम्हाला अधिक वेळ खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळे केसांचे आरोग्यही राखले जाईल. यासाठी तुम्हाला फक्त शॅम्पूमध्ये काही गोष्टी मिसळायच्या आहेत. पहा कोणत्या आहेत त्या गोष्टी...

2/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

शॅम्पूमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. त्यामुळे केस नीट स्वच्छ होतील. केसातील तेल सहज निघून जाईल. स्काल्फचा पीएच बलन्स योग्य राखता येईल.  

3/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

टी ट्री ऑईलमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल आणि अॅँटीफंगल गुण असतात. शॅम्पू टी ट्री आईल मिक्स केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल. केसांतील नैसर्गिक ऑईल टिकून राहील. आणि स्काल्फचे इंफेक्शन कमी होण्याची संभावनाही कमी होईल.  

4/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

त्वचेबरोबरच केसांच्या आरोग्यासाठीही कोरफड जेल फायदेशीर ठरते. शॅम्पूत मिक्स करुन लावल्याने केसात येणारी खाज कमी होईल. स्काल्फ ऑयली होण्याचे प्रमाण कमी होईल. केस नीट स्वच्च होतील. त्याचबरोबर केसगळती थांबण्यास मदत होईल.  

5/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

आवळा केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. एक लहान चमचा आवळा ज्यूस शॅम्पूत मिसळा आणि त्याने केस धुवा. असे नियमित केल्याने केस काळे होण्यास मदत होईल. केसांचे चांगले कंडीशनिंग होईल आणि त्याचबरोबर केस वाढीसही चालना मिळेल.   

6/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

केस खूप कोरडे झाले असल्यास एक छोटा चमचा मध शॅम्पूत मिसळा. त्यामुळे केसातील बॅक्टेरिया नष्ट होतील. केसांना चमक येईल. मात्र शॅम्पूत मध मिसळल्यानंतर केस स्वच्छ धुवा. अन्यथा मधाचा चिकचिकीतपणा केसात राहील.  

7/7

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

Things you can add in shampoo for more benefits and long and strong hair

ग्लिसरीनचे ७-८ थेंब शॅम्पूत मिसळल्याने केस मॅनेजेबल राहतील. स्काल्फही हायड्रेट राहील.