Shreyas Iyer: ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत...; टीम इंडियातून बाहेर केल्यानंतर अय्यरची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Iyer: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या T20 टीमचा भाग नाही. टीम इंडियाच्या सिलेक्शनवरून श्रेयस अय्यर टी-20 वर्ल्डकपचा भाग नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

| Jan 16, 2024, 14:08 PM IST
1/7

श्रेयस सध्या रणजी ट्रॉफी खेळत असून भारतीय संघात स्थान न मिळाल्याने श्रेयस अय्यरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

2/7

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईने आंध्रविरुद्धच्या विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "हे बघा, मी केवळ सध्याचा विचार करतो. मला जो सामना खेळायला सांगितला गेला होता तो मी पूर्ण केला आहे. 

3/7

"मी आलो आणि खेळलो. मी जे करतोय त्याबद्दल मी आनंदी आहे, असंही श्रेयसने म्हटलंय.

4/7

श्रेयसच्या म्हणण्यानुसार, माझ्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करू शकत नाही. माझं लक्ष सामना जिंकण्यावर होतं आणि आम्ही तेच केलं.

5/7

दक्षिण आफ्रिकेतील खराब कामगिरीनंतर सिलेक्टर्सने अय्यरला मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळण्याची सूचना केली.

6/7

25 जानेवारीपासून होणाऱ्या टेस्ट टीमचा श्रेयस अय्यर भाग आहे.

7/7

यावेळी इंग्लंडविरूद्धच्या 2 सामन्यांसाठी चांगला खेळ करायचा असल्याचं अय्यरने म्हटलंय.