बॉलिवूडच्या 'या' पाच सेलिब्रेटींची अधूरी प्रेम कहाणी...

bollywood celebrity couples incompleted love story: बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची प्रेमकहाणी ही अधुरीच राहिली आहे. तेव्हा जाणून घेऊया या काही पाच सेलिब्रेटींबद्दल. ज्यांची बी-टाऊनमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Jun 15, 2023, 21:57 PM IST

bollywood celebrity couples incompleted love story: बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे सेलिब्रेटी कपल्सच्या प्रेमप्रकरणांची. परंतु त्यांचे ब्रेकअप झाले की मात्र चाहत्यांना वाटतं राहते की ह्यांची प्रेमकहाणी जर का अजून खुलली असती तर? 

1/5

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन

love stories news

ऐश्वर्या राय बच्चन ही आज बच्चन कुटुंबियांची सून आहे परंतु याआधी तिचे आणि सलमान खानचे प्रेम प्रकरण खूप गाजले होते. परंतु ऐश्वर्यानं आरोप केले की सलमान तिला मारहाण करतो आणि मग त्यांतील दूरावा वाढू लागला व त्यांची प्रेम कहाणी ही अधुरीच राहिली. 

2/5

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित

love stories bollywood

संजय दत्त आणि माधुरी दीक्षितमध्येही जवळीक वाढली होती. परंतु संजय दत्तच्या 1993 सालच्या प्रकरणानंतर त्यांच्यातील दुरावा वाढला. आज दोघंही विवाहित आहेत आणि आपल्या संसारात सुखी आहेत. 

3/5

दीपिका पादूकोण आणि युवराज सिंग

incomplete love story

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या लव्ह अफेअरच्या चर्चा रंगताना दिसल्या होत्या. परंतु त्याआधी दीपिका ही क्रिकेटर युवराज सिंगलाही डेट करत होती. परंतु त्यांचे पुढे काही झाले नाही. 

4/5

रविना टंडन आणि अक्षय कुमार

bollywood news

रविना टंडन आणि अक्षय कुमार यांची 90 च्या दशकात प्रचंड चर्चा होती परंतु त्यांचे ब्रेकअप झाले. 

5/5

मधूबाला आणि दिलीप कुमार

trending news

मधूबाला आणि दिलीप कुमार यांच्या वयातही खूप अंतर होते परंतु वयाला कसलंच बंधन नसतं. त्यांच्यातील जवळीक वाढली होती परंतु त्यांची प्रेमकहाणी पुढे सरकूच शकली नाही.