....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

Jan 21, 2019, 13:16 PM IST
1/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

रोजच्या आयुष्यात किंवा जीवनशैलीत एक टप्पा असा येतो ज्यावेळी सारंकाही सुरळीत सुरू असूनही मनात एक प्रकारचा कोलाहल सुरू असतो. ज्यामुळे परिस्थिती इतकी बिघडते की अनेकदा त्याचा थेट परिणाम हा मानसिकक स्वास्थ्यावर होतो. ही अशी परिस्थिती काहींच्या वाट्याला वारंवारही येते. पण, जेव्हा ती अगदीच असह्य होते तेव्हा मात्र गोष्टी हाताबाहेर गेल्याचं लक्षात येतं.  घड्याळाच्या काट्यावर अक्षरश: त्याच्याच नियंत्रणात असणाऱ्या आपल्या दैनंदिन आयुष्यात उदभवणारे असेच अनेक प्रसंग तुमच्या मनात चाललेल्या कोलाहलाची चिन्हं समोर आणतात. ज्यामुळे कुठेतरी तुम्हालाही थांबण्याची गरज भासू लागते. काय आहेत ही नेमकी चिन्हं, याचाच विचार करताय ना? चला तर मग नजर टाकूया अशाच काही चिन्हांवर...

2/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

प्रचंड थकवा येणं- कामाच्या व्यापातून किंवा काही कारणास्तव काही काळापुरता थकवा येणं ही मोठी बाब नाही. पण, वारंवार थकवा येणं, अंथरुणात पडताच झोप येतेय असं वाटत असतानाही झोप न येणं किंवा खूप वेळ झोपूनही आपली झोप अपूर्ण राहिली असं वाटणं ही अतिथकव्य़ाची लक्षणं आहेत. 

3/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

लगेच चीडणं- अनेकदा भावनिकदृष्ट्याही व्यक्ती खचतात. मग ती भावना रागाची असो किंवा दु:खाची. आपल्या आप्तजनांवर विनाकारण चीडणं, वारंवार चिडचीड करणं, एखाद्या गोष्टीविषयी सतत तक्रार करत राहणं ही बाबही गांभीर्याने लक्ष देण्याजोगी आहे. 

4/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

एकाग्रशक्तीचा अभाव- कोणत्याही गोष्टीकडे लक्षपूर्वक दृष्टीने किंवा एकाग्रतेने पाहण्याचा अभावही गंभीर बाब आहे. मुळात एकाग्रता ही कोणत्याही कामात अतिशय महत्त्वाची असते. त्या अभावी बऱ्याचदा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. 

5/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

कामाचा दर्जा खालावणं- परिस्थिती बिघडत असल्याची बरीच लक्षणं ही अनेकदा आत्मपरीक्षणातून अधोरेखित होतात. ज्यामध्ये कामाचा दर्जा खालावणं ही बाब लगेचच लक्षात येण्याजोगी आहे. दर दिवशी किंवा दर आठवड्याला तुम्ही करत असलेल्या कामाचा आलेख हा खालावत असेल तर ही बाब चिंताजनक आहे. 

6/6

....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं

नात्यांमध्ये तेढ निर्माण होणं- अनेकदा मानसिक अस्वास्थ्याचा परिणाम हा थेट नात्यांवर होतो. आपल्या प्रिय व्यक्तीशी संपर्क तुटणं किंवा त्यात दुरावा येणं, लहानसहान गोष्टींवरच चर्चा न होणं, वादाला वारंवार तोंड फुटणं या साऱ्याचा परिणाम हा नात्यांवर लगेचच होतो. रोजच्या जीवनात समोर येणारे प्रसंग, नात्यांची तेढ, घड्याळाच्या काट्यावर धावणारे आपण सारेजण धकाधकीकडे इतक्या सवयीने पाहतो की अनेकदा ही सवयच आपल्याला गिळंकृत करु पाहते. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे लवक्षपूर्वकपणे आणि तातडीने पाहण्याची गरज आहे हेच खरं.