Photo: इम्रान खान यांच्याव्यक्तिरिक्त या खेळाडूंवर झाला होता जीवघेणा हल्ला, जाणून घ्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. सुदैवाने ते हल्ल्यातून बचावले. पण हल्ला झाल्याची ही काही पहिली वेळ नाही.

Nov 04, 2022, 19:37 PM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. सुदैवाने ते हल्ल्यातून बचावले. पण हल्ला झाल्याची ही काही पहिली वेळ नाही.

1/5

Attacks on cricketers

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू मोंडली खुमालोवर 29 जून 2022 च्या पहाटे इंग्लंडमधील सॉमरसेट येथील एका पबबाहेर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे 6 दिवस कोमात गेले होता. विजय साजरा करत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता.

2/5

Attacks on cricketers

दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू खेळाडूवर तीन वर्षांच्या कालावधीत दोन हल्ले झाले आहेत. 1999 मध्ये एटीएममधून पैसे काढत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पण या हल्ल्यातून तो बचावला. त्यानंतर 2002 मध्ये दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर कारमध्ये डांबून ठेवलं आणि लुटलं होतं.

3/5

Attacks on cricketers

पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 3 नोव्हेंबरला एका रॅलीदरम्यान हल्ला करण्यात आला. सुदैवाने ते या हल्ल्यात बचावले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.   

4/5

Attacks on cricketers

श्रीलंकन क्रिकेट संघ 2009 मध्ये पाकिस्तान दौर्‍यावर असताना लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. श्रीलंकेच्या बसवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यात संपूर्ण संघ बचावला होता. पण थिलन समरवीराच्या मांडीला गोळी लागली होती. या हल्ल्यात सहा पोलीस आणि एक चालक ठार झाला होता. 

5/5

Attacks on cricketers

2019 मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना हल्ला झाला होता. क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते. नमाजासाठी अल नूर मशिदीकडे जात होते आणि मशिदीपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हल्ला झाला होता. बांगलादेशचा संघ तिथे थोडा लवकर पोहोचला असता तर जीवघेणे ठरू शकलं असतं.