गाव महाराष्ट्रात पण त्याच गावात असलेला किल्ला मात्र गोवा राज्यात; तेरेखोल किल्ला बनलाय अलिशान हॉटेल

महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर असलेला अनोखा किल्ला. या किल्ल्यावर सुरु झालयं अलिशान हॉटेल.   

| May 06, 2024, 23:43 PM IST

Terekhol Fort On Maharashtra Goa Border : महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला ज्या गावात आहे ते गाव महाराष्ट्र राज्यात येते. मात्र, किल्ला हा गोवा राज्यात येतो. नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो तिथेच एका टेकडीवर हा किल्ला आहे. 

1/7

महाराष्ट्रात गोवा बॉर्डरवर तेरेखोल नावाचा एक अनोखा किल्ला आहे. हा ज्या गावात आहे ते गाव महाराष्ट्रात आहे. पण, किल्ला मात्र, गोवा राज्यात आहे.

2/7

मालवण - पणजी कोस्टल रोडवरच तेरेखोल गाव आहे. मालवण पासून 60 तर पणजीहून 40 किमी  अंकारवर हे गाव आहे. मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. तेरेखोल गावातूनच किल्यापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. .  

3/7

हा किल्ला गोवा राज्यात येतो. गोवा सरकारने या किल्ल्याचे अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. या किल्ल्यावरुन समुद्राचे अतिशय विहंगम दृष्य पहायला मिळते.

4/7

1794  मध्ये काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र, पोर्तुगिजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला छोटा असला तरी आसपासचा परिसर अतिशय सुंदर आहे. 

5/7

17 व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आल्याच्या नोंदी सापडतात. सावंतवाडीच्या खेमसावंतांनी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली.

6/7

तेरेखोल गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येते. मात्र याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्यात येतो. हा उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे. 

7/7

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला आहे.