या भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलींची नावे आहेत अनोखी, जाणून घ्या नावांचा अर्थ

मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंनी (Indian cricketers) आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. या खेळाडूंची मुलेही खास कारणांमुळे चर्चेत असतात. बहुतेक भारतीय क्रिकेटपटूंच्या घरात मुलींचा जन्म झाला आहे. त्यांनी आपल्या मुलींची अनोखी नावे ठेवली आहेत. या नावांचा अर्थ काय ते जाणून घेऊ या.

| Nov 18, 2021, 08:31 AM IST

1/5

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एमएस धोनी  (MS Dhoni) याची एकुलती मुलगी झिवा सिंह धोनी हिचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 रोजी झाला, झिवा याचा अर्थ 'चमकदार'.

2/5

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर  (Gautam Gambhir)  याला दोन मुली आहेत, ज्यांची नावे  आजीन (Aazeen) आणि अनाइजा (Anaiza) आहेत. हे दोन्ही शब्द अरबी भाषेतील आहेत. आजीन याचा अर्थ 'खूप सुंदर' तर अनाइजा याचा अर्थ 'सन्माननीय' आहे.

3/5

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरासोबत (Geeta Basra) लग्न केले आहे. या सेलिब्रिटी कपलच्या मुलीचे नाव हिनाया हीर प्‍लाहा (Hinaya Heer Plaha) असून तिचा जन्म 27 जुलै 2016 रोजी झाला होता. 'हिनाया हीर'  म्हणजे 'सुंदर परी'.

4/5

टीम इंडियाचा  (Team India) माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याच्या मुलीचे नाव एरियाना (Ariana) आहे, ज्याचा अर्थ 'सर्वात पवित्र' आहे.

5/5

टीम इंडियाचा  (Team India) स्टार क्रिकेटर विराट कोहली  (Virat Kohli)  आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा  (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका हिचा जन्म ११ जानेवारी २०२१ रोजी झाला. 'वामिका' हे हिंदू देवी 'दुर्गा'चे नाव आहे.