पदार्पणात 'फ्लॉप' ठरलेले कलाकार आज बॉलिवूडचे सुपरस्टार

एकदा सुरुवात चांगली झाली की, पुढचा रस्ताही चांगला असतो असं म्हटलं जातं. पण बॉलिवूडच्या काही कलाकारांनी या वाक्याला मोडीत काढत, सुरुवातीच्या काळात आलेल्या अपयशावर मात केली आहे. बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांच्या करियरच्या सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप झाले होते. पण या अपयशावर मात करत आज मात्र हे कलाकार यशशिखरावर पोहचले असून कलाविश्वात राज्य करत आहेत.

Nov 24, 2019, 15:54 PM IST
1/7

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी' चित्रपटातून कलाविश्वात डेब्यू केला होतो. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

2/7

खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षयने 'सौगंध' चित्रपटातून लीड अॅक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपट फ्लॉप ठरला. पण आज मात्र अक्षय कुमारच्या नावे सर्वाधिक १०० कोटी चित्रपट करण्याचा रेकॉर्ड आहे.

3/7

'मैने प्यार किया' हा सलमानचा पहिला चित्रपट नाही. सलमानने 'बिवी हो तो एैसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

4/7

रणबीर कपूरचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. रणबीरने संजय लीला भंन्साली यांच्या 'सांवरिया' चित्रपटातून डेब्यू केला होता.

5/7

ऐश्वर्या राय-बच्चनने 'और प्यार हो गया'मधून बॉलिवूड एन्ट्री केली. या फ्लॉप चित्रपटात तिने बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर केली होती.  

6/7

काजोल आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण काजोलचा बॉलिवूड डेब्यू 'बेखुदी' नावाच्या फ्लॉप चित्रपटातून झाला होता.

7/7

कतरिना कैफने 'बूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनीही काम केलं होतं.