रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

Nov 24, 2019, 14:15 PM IST
1/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु असतानाच त्याची मुलं आणि संपूर्ण कुटुंबसुद्धा बरंच चर्चेत आलं आहे. याला निमित्त ठरत आहे, ते म्हणजे रितेशचा मुलगा रियान याचा वाढदिवस. 

2/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

रितेशच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून बी- टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या 'बच्चेकंपनी'सोबत हजर राहिली. यावेळी खुद्द रितेश आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांनी पाहुणे मंडळींचं स्वागतही केलं. 

3/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

सलमान खानची बहीण, अर्पिता खान शर्मा आणि तिचा मुलगा या पार्टीला आले होते. 

4/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

तर, अभिनेता विवेक ओबेरॉयही त्याच्या मुलासह या पार्टीत पाहायला मिळाला. 

5/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत तिच्या मुलीसह पार्टीत साऱ्यांचं लक्ष वेधून गेली. यावेळी तिचा लूक पाहण्याजोगा होता. 

6/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

अभिनेता तुषार कपूर हासुद्धा त्याच्या मुलासोबत रियानच्या बर्थडे पार्टीला पोहोचला होता. 

7/7

रितेश- जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांच्यावरही पार्टीदरम्यान माध्यमांच्या नजरा खिळल्या होत्या.