Mens Health : शरीरात 'या' गोष्टींच्या कमतरतेमुळे पुरूष बनू शकत नाही पिता
या हार्मोनच्या कमतरतेमुळे टाईप-2 मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी काही लक्षणांद्वारे तुम्ही टेस्टोस्टेरॉन पातळीची कमतरता ओळखू शकता.
Testosterone Deficiency : लग्नानंतर बहुतेक पुरुषांची इच्छा असते की त्यांना एक दिवस वडिल बनण्याचं सुख मिळावं, पण यासाठी तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता नसणं महत्वाचं आहे. हे एक हार्मोन आहे जे पुरुषांच्या अंडकोषांमध्ये असतं आणि यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा वाढण्यास मदत होते. त्याच्या मदतीने रक्ताभिसरण, स्नायूंची ताकद, एकाग्रता आणि स्मरणशक्ती चांगली होते. या हार्मोनच्या कमतरतेमुळे टाईप-2 मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी काही लक्षणांद्वारे तुम्ही टेस्टोस्टेरॉन पातळीची कमतरता ओळखू शकता.