मुंबईतील विनायकाची मंदिरे

मुंबईतील गणपतीची मंदिरे ऐतिहासिक आहेत ,आणि ती मंदिरे कशी निर्माण झाली ?कोणी केली ?या गोष्टी ऐकायला फार रंजक आहेत.

Sep 05, 2024, 17:12 PM IST

मुंबईतील गणपतीची मंदिरे ऐतिहासिक आहेत ,आणि ती मंदिरे कशी निर्माण झाली ?कोणी केली ?या गोष्टी ऐकायला फार रंजक आहेत.

1/8

मुंबई नगरीत गणेशोत्सव फार धूमधडाक्यात साजरा केला जातो, मुंबईत समाविष्ट असणाऱ्या शहरांमध्ये जागोजागी गणपतीची मंदिरे आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकीच काही महत्त्व प्राप्त झालेल्या मंदिरांबद्दल जाणून घेऊया.

2/8

पिंपळ गणेश मंदिर, माझगाव

माझगावमधल्या बी.पी.टी कंटेनर रोडवर एका पिंपळाच्या झाडाला गणपतीसारखा आकार आला होता. तो आकार पाहिल्यानंतर भाविकांनी तेथे गणेशाचे मंदिर स्थापन केलेय. झाडाच्या ज्या भागावर गणेशाचा आकार दिसला त्या प्रत्येक भागाला चांदीचा मुकूट बसवला आहे. भाविक आवर्जून या मंदिराला भेट देतात.

3/8

प्रभादेवीचा सिद्धीविनायक

या मंदिरात सिद्धीविनायकाची उजव्या सोंडेची चर्तुभूज मूर्ती आहे. गणेशाच्या वरच्या हातात अंकूश व कमळ आणि खालच्या हातात जपमाळ व मोदक आहे . जून्या मंदिराची डागडुजी करून नवी इमारत उभारण्यात आली आहे. मंदिरातील मूर्ती काळ्या दगडाची आहे पण आता तिच्यावर रंग लावण्यात आला आहे.

4/8

बोरिवलीतील गणेश मंदिर

पश्चिम बोरिवलीमधील वजीरा नाक्यावर शेकडोवर्ष जूने गणेश मंदिर आहे. आधी कोळी,भंडारी समाज दर्शनाचा लाभ घ्यायचे. मात्र आता बरेच भाविक मंदिराला भेट देतात. उत्तरेकडे गणेशाची मूर्ती आहे बाजूला शितला देवीची मूर्ती , मारुतीची मूर्ती ,ग्रामदैवत आलजेदेवाची मंदिरे अशी  एकूण पाच मंदिरे आहेत.

5/8

गिरगावचा फडकेवाडीतला गणपती

यशोदा गोविंद फडके या अलिबागच्या रहिवासी होत्या. पतीच्या निधनामुळे त्या निपूत्रीक राहील्या. त्यांनी मग गणपतीली आपला पुत्र मानले आणि 1890 साली या मंदिराची स्थापना केली.पूढे त्यांच्या नातेवाईकांनी मंदिराची देखभाल केली. मूर्तीचे मखर आणि गाभाऱ्याचे दरवाजे चांदीचे आहेत.

6/8

जोगेश्वरी लेण्यांमधील गणेश मंदिर

मुंबईत असलेल्या लेण्यांपैकी जोगेश्वरीच्या लेण्यांमध्ये गणेश मंदिर आहे. जोगेश्वरी ही शैवलेणी आहे .हे मंदिर गुहेत आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना मानले जाते. दगडात कोरलेल्या या मंदिरातील मूर्तीला कपाळावर शेंदूर लावलेला आहे. गुहेच्यासमोर खांब आहेत  मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

7/8

वांच्छासिद्धीविनायक मंदिर

वांच्छासिद्धीविनायक हे मंदिर 1927 साली बांधले गेले.मंगळवारी मंदिर भाविकांनी भरलेले असते . वांच्छा म्हणजे इच्छा त्यामुळे इच्छापूर्ती करणारा गणपती असे या मंदिरातील गणपतीला मानले जाते. 1997 ला मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला तेव्हा पाच मजली इमारत उभारण्यात आली. मंदिरात शंकर, मारुती, लक्ष्मी यांचीसुद्धा मंदिरे आहेत. हे मंदिर पाठारे प्रभुंच दैवत आहे.

8/8

धारावीचा महाराजा

तामिळनाडू मधील दलित समाज मुंबईतील धारावीमध्ये स्थायिक झाला आणि चामड्याचा व्यवसाय करु लागला . या दक्षिण भारतातील समाजाला अदीद्रविण समाज असे म्हटले जाते. या समाजाच्या काही लोकांनी मिळून या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर पिंपळाच्या झाडाखाली बांधण्यात आले होते.