SameerSharmaSuicide: समीरने या मालिकांमध्ये साकारली होती भूमिका; चित्रपटांमध्येही केलं होतं काम
टेलिव्हिजन अभिनेता समीर शर्माने त्याच्या मालाड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या 44व्या वर्षी समीरने आपलं जीवन संपवलं.
दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह तसापासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या राहत्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाही, तोच समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे.
1/5
2/5
4/5