नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

Aug 06, 2020, 19:16 PM IST
1/5

नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : Coronavirus कोरोना व्हायरच्या वाढत्या रुग्णांची संख्या दिवसागणिक नवी आव्हानं उभी करतानाच आता आणखी एक चिंतेच टाकणारी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील युवा स्वाभीमान‌ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला‌ आहे.

2/5

नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

यापूर्वी आमदार रवी राणा हे विधानसभा अध्यक्ष‌ नाना पटोले यांच्या कोरोनाबाधित स्वूय‌ सहायक्काच्या संपर्कात आल्याने त्यांना मुंबईमध्येच गृह विलगीकरणात रहावे लागले‌ होते. परंतु मुंबईवरुन परतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी‌ त्यांच्या वडिलांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  

3/5

नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना पुढील उपचाराकरता नागपुर येथील व्होकार्ट रूग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. 

4/5

नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

गुरुवारी सकाळी खासदार नवनीत राणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला होता आणि आता‌ नुकत्याच हाती आलेल्या माहीतीनुसार आमदार रवी राणा यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

5/5

नवनीत‌ राणांनंतर, आमदार रवी राणासुध्दा कोरोनाबाधित

प्रशासनामार्फत आमदार रवी राणा यांचे निवासस्थान आणि आजुबाजूचा परीसर सॅनिटाईज केला गेला आहे. आमदार राणांच्या परीवाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रीया प्रशासनामार्फत सुरू झाली आहे.