टीम इंडियाच्या 'या' चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्ती

Indian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या 

| Aug 11, 2024, 17:02 PM IST
1/5

शिखर धवन

2013 मध्ये शिखर धवनने टीम इंडियाकडून टेस्टमध्ये डेब्यू केला होता. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. मात्र, 2018 नंतर त्याचा फॉर्म गडगडला आणि त्याला संघातून बाहेर जावं लागलं. गेल्या 6 वर्षापासून तो टेस्ट क्रिकेट खेळत नाहीये.

2/5

करुण नायर

चैन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात जेव्हा करूण नायरने ट्रिपल सेंच्युरी ठोकली होती, तेव्हा तो खूप टेस्ट क्रिकेट खेळेल, असं वाटत होतं. पण 2017 नंतर करुण नायर टेस्ट क्रिकेटमधून गायब झाला. आता तो पुन्हा टेस्टकडे वळणार की निवृत्ती घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

3/5

रिद्धिमान साहा

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज रिद्धिमान साहा याने 2010 मध्ये डेब्यू केला होता. मात्र, 40 वर्षाचा रिद्धिमान साहा आता कसोटी क्रिकेट खेळणार नाही, असंच चित्र आहे. अशातच रिद्धिमान साहा निवृत्ती घेऊ शकतो.

4/5

भुवनेश्वर कुमार

एकेकाळी स्विंगचा बादशाह ठरलेला भुवनेश्वर कुमार टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होती. मात्र, भूवीला 2018 नंतर टेस्ट क्रिकेट खेळता आली नाही. भूवीने 21 सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत.

5/5

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचं शेड्यूल

पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर टीम इंडिया तीन टी-20 सामने खेळेल.