TATA CURVV SUV देणार रॉयल फिल! रतन टाटांनी आणली मध्यमवर्गीयांना परवडणारी कार; किंमत पाहून लगेच बुकींग कराल

Tata Curvv ICE Petrol Diesel:  TATA CURVV SUV पेट्रोल-डिझेल व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. Maruti, Toyota, Hyundai, Kia यांना TATA CURVV SUV टक्कर देणार आहे.   

Sep 02, 2024, 17:56 PM IST

TATA  CURVV SUV : जगभरातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दबदबा असणाऱ्या TATA कंपनीने अनोख्या डिजाईनची जगातील पहिली कार लाँच केली. जगभरात अद्याप कोणत्याही कंपनीने अशा प्रकारच्या डिझाईनची कार लाँच केलेली नाही. जगभरात या कारच्या डिझाईनची चर्चा सुरु होती. बहुप्रतिक्षित कुपे-स्टाईल  एसयुव्ही Tata Curvv EV चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केल्यानंतर कंपनीने आता या कारचे पेट्रोल-डिझेल व्हर्जन लाँच केले आहे.किंमत पाहता की कार बजेट फ्रेंडली आहे. Maruti, Toyota, Hyundai, Kia यासारख्या ब्रँडच्या SUV ना टाटाची SUV टक्कर देणार आहे. 

1/7

फ्रेंच कार कंपनी Citroen अनोख्या डिझाईनची कार लाँच करण्याच्या तयारीत असताना  TATA कंपनीने बाजी मारली.  टाटाने बहुप्रतिक्षित कुपे-स्टाईल इलेक्ट्रिक एसयुव्ही Tata Curvv EV ला अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली

2/7

 पेट्रोल-डिझेल व्हेरिंएंटमध्ये देखील जबरदस्त पावर मिळेल. एंट्री-लेव्हल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 10 लाखांपासून स्टार्ट होते. तर, डिझेल व्हर्जनच्या बेस मॉडेलची किंमत 11.49 लाखांपासून सुरू होते. 

3/7

Tata Curvv EV मध्ये 55kWh आणि 45kWh असे दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत.  5 मिनिटात कार फूल चार्ज होते. सिंगल चार्जमध्ये 585KM रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे. 

4/7

इलेक्ट्रिक व्हर्जन प्रमाणेच पेट्रोल-डिझेल व्हेरिंएंट कारचे इंटेरियर देखील खूपच स्पेशियस आहे. यात बूट स्पेस देण्यात आला आहे. यासह यात पॅनोरामिक सनरूफ देखील देण्यात आला आहे.   

5/7

इलेक्ट्रिक व्हर्जननंतर  TATA  CURVV SUV  कार ICE  पेट्रोल-डिझेल व्हेरिंएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पावर आणि मायलेजच्या बाबतीत कार दमदार परफॉर्मन्स देईल. पेर्ट्रोल आणि इलेक्ट्रीक अशा दोन्ही व्हर्जनमध्ये याचा अनुभव येईल.

6/7

 7 ऑगस्ट पासून  Tata Curvv EV चे इलेक्ट्रिक व्हर्जनची विक्री सुरु झाली. या इलेक्ट्रिक एसयुव्हीची स्टार्टिंग प्राईज 17 लाख 49 हजार (एक्स-शोरुम) इतकी आहे. 

7/7

TATA कंपनीने लाँच केलेली अनोख्या डिजाईनची कार म्हणजे जगातील पहिली कर्व्ह शेप असलेली SUV कार आहे. TATA  CURVV SUV असे या कारचे नाव आहे. या कारचा लूक अतिशय जबरदस्त असा आहे.