'तारक मेहता' पासून 'टप्पू' पर्यंत, सतत बदलले 'हे' कलाकार

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एक दशक पेक्षा जास्त काळापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. पण या शोची लोकप्रियता हळू हळू कमी होते. त्याचं कारण सतत बदलणारी स्टार कास्ट असल्याचं म्हटलं जातं. मग आता या मालिकेत किती भूमिकांमध्ये कलाकार बदल गेले याविषयी जाणून घेऊया.

| Jun 24, 2024, 18:56 PM IST
1/7

सोनू

सगळ्यात आधी या मालिकेतील सोनू ही भूमिका तीन अभिनेत्रींनी साकारली आहे. आता तीन अभिनेत्रींनी म्हणजेच सगळ्यात आधी झील मेहता, त्यानंतर निधी भानुशाली आणि त्यानंतर तिसरी पलक सिधवानीनं ही भूमिका साकारली होती. 

2/7

रोशन भाभी

रोशन भाभी ही भूमिका सगळ्यात आधी जेनिफर मिस्त्रीनं साकारली होती. त्यानंतर मोनाज मोनावालनं ही भूमिका साकारली. जेव्हा जेनिफर मिस्त्रीनं ब्रेक घेतला होता त्या दरम्यान, काही काळासाठी दुसरी रोशन भाभी आणण्यात आली आणि तिला दिलखुशनं साकारली होती. 

3/7

अंजली भाभी

अंजली भाभी ही भूमिका आधी नेहा मेहता साकारत होती त्यानंतर तिच्या जागी सुनैना फौजदारनं ती भूमिका साकारली. 

4/7

तारक मेहता

तारक मेहता ही भूमिका गाजवणारे शैलेश लोढा सगळ्यांचे चाहते होते. तर त्यांनी मालिकेतून काढता पाय घेता सचिन श्रॉफ ही भूमिका साकारत आहे. 

5/7

रोशन सिंग सोढी

रोशन सिंग सोढी ही भूमिका सुरुवातीला गुरुचरण सिंगनं साकारली होती. त्यानंतर लाड सिंगनं ही भूमिका साकारली आणि मग त्याच्या जागी बल्विंदर सिंगनं ही भूमिका साकारली. 

6/7

टप्पू

टप्पूची भूमिका देखील तीन कलाकारांनी साकारली आहे. सुरुवातीला ही भूमिका भव्या गांधीनं साकारली होती. त्यानंतर राज अनादकट आणि मग त्याच्या जागी नीतीश भलूनी या भूमिकेत दिसतोय. 

7/7

डॉ. हाथी आणि नट्टू काका

डॉ. हाथी आणि नट्टू काका या भूमिका साकारणारे कवी कुमार आणि घनश्याम नायक यांचे शोमध्ये असतानाच निधन झाले. अशात डॉ. हाथीची भूमिका निर्मल सोनी साकारत आहे. तर नट्टू काकाची भूमिका किरण भट्ट साकारत आहेत.