सुपर-8 आधी टेन्शन फ्री! बारबाडोसच्या समुद्रकिनारी टीम इंडियाच्या खेळाडूंची शर्टलेस होत धमाल... पाहा Photo

T20 World Cup Super-8 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाने अपराजीत राहात दिमाखात सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. 19 तारखेपासून सुपर-8 सामन्यांना सुरुवात होत असून टीम इंडियाचा पहिला सामना 20 जूनला रंगणार आहे. त्या आधी टीम इंडियाचे खेळाडू बारबाडोसमध्ये समुद्रकिनाऱ्यावर धमाल-मस्ती करताना दिसली.

Jun 17, 2024, 17:48 PM IST
1/7

टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचे सर्व सामने अमेरिकेत खेळवण्यात आले होते. आता सुपर-8 च्या सामन्यांसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 खेळवला जाणार आहे.

2/7

20 जूनला टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. हा सामना बारबाडोसमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया बारबाडोसला पोहोचली असून सामन्याआधी टीम इंडिया टेन्शन फ्री दिसली. बारबाडोसच्या समुद्रकिनाऱ्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी धमाल मस्ती केली.

3/7

समुद्र किनाऱ्यावर टीम इंडियाचे खेळाडू शर्टलेस होत व्हॉलीबॉल खेळताना दिसले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट कोहली, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या शर्टलेस होत खेळताना दिसत आहेत.

4/7

व्हॉलीबॉल खेळण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये दोन ग्रुप करण्यात आले होते. एका ग्रुपमध्ये रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, युजवेंद्र चहल या खेळाडूंचा समावेश होता, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या अशा सीनिअर खेळाडूंचा समावेश होता.

5/7

सतत क्रिकेट खेळत असल्याने खेळाडूंना थोडासा विरंगुळा म्हणून वेगळे खेळ खेळण्यास परवानगी दिली जाते. यात फुटबॉल, व्हॉलीबॉल सारख्या खेळांचा समावेश असतो. खेळाडूंना तंदरुस्त राहाण्यासाठी अशा अॅक्टिव्हिटी महत्त्वाच्या असतात. वेस्ट इंडिजमध्ये बीच व्हॉलिबॉल प्रसिद्ध आहे. 

6/7

बारबाडोसच्या समुद्रकिनाऱ्यावर व्हॉलिबॉल खेळल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळला. टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होणार असून त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. 

7/7

सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध आहे. तर दुसरा सामना 22 जूनला बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. त्यानंतर 24 जूनला टीम इंडियाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे.