Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!

Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!

Jul 28, 2023, 10:20 AM IST

IND vs WI, Sanju Samson: ब्रिजटाऊन बारबाडोसच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडे असणार आहे.

1/5

संजू सॅमसनला संधी नाही

पहिल्या सामन्यात चौथ्या स्थानासाठी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. मात्र, संजू सॅमसनला संधी देण्यात आली नाही. अशातच आता एक फोटो तुफान ट्रेंड होत असल्याचं दिसतंय.

2/5

संजू मैदानात कसा?

सामन्यात संधी मिळाली नसतानाही संजू मैदानात उतरला कसा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मात्र, आता त्या फोटोमगील रहस्य समोर आलंय.

3/5

संजू सॅमसनची जर्सी घालून सूर्यकुमार मैदानात

सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय.

4/5

गोलंदाजीची धुरा

शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक या गोलंदाजांच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे.

5/5

मुकेश कुमार डेब्यु

दरम्यान, या सामन्यात मुकेश कुमार याने डेब्यु केला आहे. कसोटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे त्याला आता वनडेमध्ये देखील स्थान मिळालंय.