पाकिस्तानात हिंदू महिलेनं रचला इतिहास

इस्लामाबाद : सुमन कुमारी पाकिस्तानातील दिवाणी न्यायालयात नियुक्त होणारी पहिली हिंदू न्यायाधीश महिला बनलीय. 

Jan 30, 2019, 11:31 AM IST
1/5

पहिली हिंदू न्यायाधीश महिला

पहिली हिंदू न्यायाधीश महिला

कम्बर - शाहददकोटची रहिवासी असलेल्या सुमन आपल्या मूळ जिल्ह्यातच न्यायाधीश म्हणून काम करणार आहे. 

2/5

कायद्याचं शिक्षण

कायद्याचं शिक्षण

सुमन कुमारी यांनी हैदराबादहून एलएलबी आणि कराचीच्या सय्यद जुल्फिकार अली भुट्टे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतून कायद्याचं शिक्षण घेतलंय. 

3/5

गरिबांसाठी काम करणार

गरिबांसाठी काम करणार

सुमनचे वडील पवन कुमार बोदान यांच्या म्हणण्यानुसार, गरिबांना कायद्याची मोफत मदत उपलब्ध करून देण्याची सुमनची इच्छा आहे. ती आपल्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे आपलं काम करेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केलीय. 

4/5

शिक्षणाचा वारसा

शिक्षणाचा वारसा

सुमनचे वडील पवन कुमार बोदान हे नेत्रतज्ज्ञ आहेत. तिचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बहीण चार्टर्ड अकाऊंटट आहे. 

5/5

दोन टक्के जनता हिंदू

दोन टक्के जनता हिंदू

पाकिस्तानातील एकूण लोकसंख्येपैंकी दोन टक्के जनता हिंदू आहे... हिंदू हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.