वयवर्ष 22 पण सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण, अनन्या आता थेट PMO ला करणार रिपोर्ट?

 IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

| Mar 07, 2024, 17:41 PM IST

IAS Ananya Singh: IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

1/7

वयवर्ष 22 पण सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण, अनन्या आता थेट PMO ला करणार रिपोर्ट!

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

IAS Ananya Singh: आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. कारण जन्मत: कोणी शिकून येत नाही. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावरच सर्वकाही साध्य करता येते. याच जोरावर काही व्यक्तिमत्व तर कमी वयातच यश मिळवतात. 

2/7

22 व्या वर्षी यूपीएससी

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

यूपीएससी परीक्षा ही जगातील कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. पण IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

3/7

थेट पीएमओला रिपोर्ट

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

वयाच्या 22 व्या वर्षी अनन्या आयएएस झाल्या. मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या पदावर पोहोचल्यावर त्या थेट पीएमओला रिपोर्ट करतील.

4/7

आयएएस बनण्याचे स्वप्न

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

बारावीनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. चांगले गुण मिळाल्याने अनन्याला मेडिकल किंवा इंजिनीअरिंग क्षेत्र निवडता आले असते. पण आयएएस अधिकारी बनणे हे अनन्याचे बालपणीचे स्वप्न होते.

5/7

एआयआर-51 रॅंकिंग

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

पदवीनंतर लगेचच अनन्याने यूपीएससी तयारीचा प्रवास सुरू केला. 2019 मध्ये त्यांना यूपीएससीचा पहिला अटेम्प्ट द्यायचा होता. यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला आणि त्यांना मेहनतीचे फळ मिळाले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना ऑल इंडिया रॅंकिंग-51 मिळाले. 

6/7

काय होती स्टॅटर्जी?

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

अनन्याने प्रामुख्याने लेखनावर लक्ष केंद्रित केले. सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. रोजचे 7 ते 8 तास सतत अभ्यास केला. सध्या अनन्या या पश्चिम बंगाल केडरच्या देशातील सर्वात प्रिय नोकरशहांपैकी एक आहेत.

7/7

इंस्टाग्रामवर 43.5K फॉलोअर्स

Success Story IAS Ananya Singh Crack UPSC 22 Age Report to PMO

अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या आपल्या जिवनाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियात शेअर करत असतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 43.5K फॉलोअर्स आहेत.