दोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन

Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची. 

| Aug 13, 2024, 15:29 PM IST
1/10

बॉलिवूड पदार्पणाआधी तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्री जगाचा निरोप घेतला आहे. पण तरीही ती कायम चाहत्यांचा मनात घर करुन आहे. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडमधील पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्याबद्दल. दुबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. आज 13 ऑगस्ट 1963 त्यांचा जन्म झाला होता. 

2/10

तामिळनाडूमधील मीनमपट्टी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या चौर्थ्या वर्षी त्यांनी 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार कामाला सुरुवात केली. यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्यांनी 'रानी मेरा नाम' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

3/10

श्रीदेवीने 1979 मध्ये 'सोहलवा सावन' या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून कामाला सुरुवात केली पण हवी तशी ओळख निर्माण झाली नाही. त्यानंतर 1983 मध्ये 'हिम्मतवाला' चित्रपटातून श्रीदेवीने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री मारली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 

4/10

80 आणि 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये श्रीदेवीची जादू अशी होती की केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनी त्यांची भीती वाटायला लागली होती. कारण बॉलिवूडमध्ये  80 आणि 90 च्या दशकात निर्माता-दिग्दर्शकांनी श्रीदेवीला चित्रपट हिट करण्याचा सर्वात मोठा फॉर्म्युला मानत होते. हेच कारण होतं की श्रीदेवी या अशा अभिनेत्री होत्या की ज्या अभिनेत्यापेक्षा सर्वाधिक मानधन म्हणून 1 कोटी रुपये घ्यायच्या. 

5/10

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवीची लव्ह लाइफ फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती. त्यांनी विवाहित आणि दोन मुलांचे वडील बोनी कपूरशी लग्न केलं होतं. पण त्यापूर्वी त्यांचे नाव दोन अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. 

6/10

श्रीदेवीच्या अफेअरची जेव्हा चर्चा होते तेव्हा मिथुनसोबत तिच्या नावाचा उल्लेख नक्कीच होतो. एकेकाळी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं. मिथुनला श्रीदेवीच्या सौंदर्याने भुरळ घातली होती. त्यांच्या नात्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यावेळी मिथुन यांचं लग्न आधीच झालं होतं. 

7/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्न झाल्यानंतरही मिथुनला श्रीदेवीसोबत सेटल व्हायचं होतं. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते, ज्याची माहिती योगिता बालीलाही होती. किशोर कुमारला घटस्फोट देऊन मिथुनसोबत लग्न केल्यानंतर योगिता बालीला हे नाते आवडले नाही. त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेनंतर मिथुन हे प्रचंड घाबरले होते. त्याने श्रीदेवीशी बोलणे बंद केलं ज्याचा परिणाम असा झाला की हे नातं संपुष्टात आलं. 

8/10

यानंतर श्रीदेवीचं नाव जितेंद्रसोबत जोडले गेलं. खरंतर, त्यावेळी दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अनेक चित्रपटात झळकले होते. त्यांची जोडी चाहत्यांना आवडत होती. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या अफवा उडू लागल्या होत्या. त्यावेळी जितेंद्रही विवाहित होते. अशा परिस्थितीत जितेंद्र स्वत: श्रीदेवीला घरी घेऊन गेले आणि शोभाचे गैरसमज दूर करुन आपला संसार वाचवला. 

9/10

मग श्रीदेवीच्या आयुष्यात बोनी कपूरची एन्ट्री एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. बोनीचं पूर्वीच लग्न झालं होतं. त्यांची पत्नी मोना शौरी याही श्रीदेवीच्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांच्या घरी राहत होत्या. एक काळ असा होता की मिथुनला तिच्या प्रेमाची खात्री देण्यासाठी श्रीदेवीने बोनी कपूरला राखी बांधली होती. श्रीदेवीचे मिथुनसोबतचे नातं तुटल्यावर ती बोनी कपूरच्या जवळीक वाढली. यानंतर, श्रीदेवींच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर आल्यात, ज्यानंतर बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट दिला आणि 2 जून 1996 ला श्रीदेवीशी लग्न केलं. 

10/10

श्रीदेवीने तिच्या 51 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलंय. तर मॉम हा श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट ठरला, ज्यासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या मृत्यूनंतर, त्या शेवटची झिरो चित्रपटात दिसल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी कॅमिओ केला होता.