नट्टापट्टा आणि घायाळ करणारं हास्य; साई पल्लवीनं शेअर केले साखरपुड्याचे फोटो

Sai Pallavi : अशी ही साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि निमित्त असं आहे ज्याची कोणीही अपेक्षाच केली नसेल. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंडळींना किंबहुना याची कल्पना आली असावी.   

Jan 25, 2024, 10:43 AM IST

Sai Pallavi Shares Engagement Photos : अभिनेत्री साई पल्लवी ही कायमच तिच्या वेगळेपणामुळं चाहत्यांच्या नजरा वळवते आणि प्रत्येकाचच मन जिंकून जाते. मग तो तिचा चित्रपट असो किंवा एखादी सोशल मीडिया पोस्ट. 

 

1/7

साई पल्लवी चाहत्यांच्या भेटीला

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

Sai Pallavi Shares Engagement Photos : सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी सहल, कुटुंबासोबतचे खास क्षण, आपल्या जीवनातील एखादा खास प्रसंग या आणि अशा अनेक कारणांनी साई पल्लवी चाहत्यांच्या भेटीला असते. 

2/7

साखरपुड्याचे फोटो

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

सध्या साई पल्लवी तिच्या कोणा चित्रपटामुळं नव्हे, तर सोशल मीडिया पोस्टमुळेच पुन्हा चर्चेत आली आहे. कारण, इथं तिनं चक्क साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. नट्टापट्टा आणि घायाळ करणारं हास्य असं तिचं रुपडं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.   

3/7

थकक् झालात ना?

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

साखरपुड्याचे फोटो...? वाचूनच थकक् झालात ना? साई पल्लवीचा साखरपुडा झाला? असाही प्रश्न तुमच्या मनात घर करेल. पण, हे फोटो तिच्या साखरपुड्याचे नसून धाकट्या बहिणीच्या साखरपुड्यातील आहेत.   

4/7

साई पल्लवीची धाकटी बहीण

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

साई पल्लवीची धाकटी बहीण, पूजा कन्नन हिचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, विनीत असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे. 

5/7

कमाल फोटो

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

साईनं यावेळी बहिणीच्या साखरपुडा सोहळ्याची काही कमाल फोटो शेअर केले. जिथं आनंद, कल्ला आणि भावनांचं सुरेख चित्रण पाहायला मिळालं.   

6/7

पेस्टल शेड्समधील पेहरावाला पसंती

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

साई आणि तिच्या कुटुंबानं पूजाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं सुरेख अशा पेस्टल शेड्समधील पेहरावाला पसंती दिली होती. ज्यामुळं प्रत्येकजण तितकाच सुरेख दिसत होता.   

7/7

छाया सौजन्य...

South indian Actress Sai Pallavis sister engagement ceremony photos viral

पूजा आणि साई पल्लवी यांच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य असल्यामुळं प्रथमदर्शनी साईचाच साखरपुडा झाला की काय, असा प्रश्न अचानकच चाहत्यांना पडला. पण, पुढच्याच फोटोंनी या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात दिलं. (छाया सौजन्य- साई पल्लवी/ इन्स्टाग्राम)