तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

Aug 29, 2019, 14:48 PM IST
1/5

तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

दाक्षिणात्य कलाकारांची लोकप्रियता फक्त स्थानक चित्रपसृष्टीपुरताच मर्यादित राहिली नसून आता या कलाकारांना साऱ्या विश्वात प्रसिद्धी मिळाली आहे. अशा अभिनेत्यांमधील आणि अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुख्य म्हणजे चिरतरुण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांचं. 

2/5

तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

१९९२ मध्ये नागार्जुन यांनी श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'खुदा गवाह' या चित्रपटातून नागार्जुन यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. यापूर्वीच ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ठरले होते. 'LoC कारगिल' या चित्रपटातूनही ते झळकले होते. 

3/5

तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

असं म्हटलं जातं की, बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि नागार्जुन यांचं नातं बरंच चर्चेत होतं. पण, विवाहित असल्यामुळे त्यांनी तब्बूशी लग्न केलं नाही. तब्बूने आजपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचं कारण म्हणजे त्यांचं नागार्जुन यांच्यावरील प्रेम असल्याचं म्हटलं जातं. 

4/5

तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

कलाविश्व आणि खासगी आयुष्याचा समतोल राखणाऱे नागार्जुन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. अभिनयासोबतच ते एक यशस्वी व्यावसायिकही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला त्यांच्याकडे जवळपास ३ हजार कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं जातं. निर्मिती संस्था, स्वत:चा स्टुडिओ, एमएनएन रिअॅलिटी एंटरप्रायजेस अशा विविध माध्यमांनी विविध रुपांत ते सक्रिय असतात. 

5/5

तब्बूसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारा अभिनेता आज ३ हजार कोटींचा मालक

सर्वाधिक कमाईच्या बळावर फोर्ब्सच्या यादीत दोनदा नागार्जुन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. आलिशान आणि तितक्याच महागड्या कारचीही त्यांना आवड आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे रोल्स रॉयस, रेंज रोव्हर बीएमडब्ल्यू आणि पोर्शे अशा महागड्या कार आहेत. मुख्य म्हणजे हा अभिनेता आजही नव्या जोमाच्या कलाकारांना तगडी टक्कर देत आहे.