क्रिकेट नव्हे, 'या' अनपेक्षित क्षेत्रात करिअर करतेय गांगुलीची लेक; पगार माहितीये का?

Sourav Ganguly Daughter Sana : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीबीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याची लेकही याच अपवादापैकी एक.   

Jan 01, 2024, 13:03 PM IST

Sourav Ganguly Daughter Sana : सहसा वडील किंवा घरातील वडीलधारं एखाद्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून अधिपत्य गाजवत असेल तर, कुटुंबातील पुढची पिढी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेते. काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. 

1/7

टीम इंडियासाठी बहुमूल्य योगदान

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

सौरव गांगुली यांनं टीम इंडियासाठी बहुमूल्य योगदान दिलं. त्याची लेक या क्रिकेट क्षेत्रात वडिलांच्या निवृत्तीनंतर करिअर करते का अशीच उत्सुकता अनेकांना लागली होती. पण, सना गांगुली अर्थात गांगुलीच्या मुलीनं मात्र वेगळीच वाट निवडली. 

2/7

कॉर्पोरेट जगताची निवड

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

क्रिकेट जगताला बगल देत सनानं कॉर्पोरेट जगतात भवितव्य घडवण्याचा निर्णय घेतला असून, इथं तिला समाधानकारक पगारही देण्यात येत आहे. 

3/7

पदवी शिक्षण

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

वयाच्या 21 व्या वर्षी सनानं कॉर्पोरेट जगातातून करिअर करण्याचा निर्णय घेत ती या वाटेवर यशस्वीरित्या चालू लागली. युनायटेड किंग्डममधील युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून तिनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून, सध्या ती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करतेय. 

4/7

कॅम्पस इंटर्नशिप

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

सनानं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक कॅम्पस इंटर्नशिप केल्या, तिनं एनेक्टसमध्येही काम केलं. एचएसबीसी (HSBC), केपीएमजी (KPMG), गोल्डमॅन सॅक्स (Goldman Sachs), बार्कलेज (Barclays), आईसीआईसीआय (ICICI) अशा कंपन्यांसाठी इंटर्नशिप केली. 

5/7

मल्टीनॅशनल कंपनीत करिअर

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात असताना सनानं PwC या मल्टीनॅशनल कंपनीत काम सुरु केलं. अनेक वृत्तांच्या हवाल्यातून समोर आलेल्या माहितीनुसार PwC  कंपनी निपूण इंटर्न्सना जवळपास 30 लाखांचं पॅकेज देते. 

6/7

PwC मधील इंटर्नशिप

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

PwC मधील नोकरीनंतर सना कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठं नाव असणाऱ्या डेलॉइट (Deloitte)वर लक्ष केंद्रीत करत आहे.   

7/7

Deloitte मधील पॅकेज

Sourav Gangulys daughter choose corporate career with PwC and Deloitte Know Sanas salary

सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्यामध्ये तिची ही इंटर्नशिप सुरु होईल. इथं तिला इंटर्न म्हणून दरवर्षी 5 ते 10 लाख रुपयांचं पॅकेज मिळू शकतं.