PHOTO: 442 किमी रेंज, अप्रतिम फीचर्स, लवकरच येतेय Sony-Honda ची इलेक्ट्रिक कार

Sony Honda Afeela Electric Car: जपानमधील Sony-Honda दोन प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार 'अफिला' लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. दमदार फीचर्ससह 442 किमी रेंज असणारी Sony-Honda कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च होणार आहे.   

| Dec 10, 2024, 16:36 PM IST
1/7

Sony-Honda

जपानमधील Sony-Honda दोन प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार 'अफिला' लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. 

2/7

ऑर्डर घेणे सुरु

गेल्या अडीच वर्षांपासून या दोन्ही कंपन्या या इलेक्ट्रिक कारवर काम करत होत्या. आता सोनीने या कारसाठी ऑर्डर घेणे सुरु केले आहे. 

3/7

Afeela

Sony-Honda पुढील महिन्यात  7 जानेवारीला होणाऱ्या CES 2025 कार्यक्रमात आपली नवीन इलेक्ट्रिक कार Afeela सादर करणार आहेत. 

4/7

पत्रकार परिषद

ही कार लॉन्च करण्यापूर्वी 6 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या कारशी संबंधित सर्व माहिती देण्यात येणार आहे. 

5/7

एयर-स्प्रिंग सस्पेंशन सिस्टम

या इलेक्ट्रिक कारची कामगिरी उत्कृष्ट असेल. या कारमध्ये एयर-स्प्रिंग सस्पेंशन सिस्टम आणि मागच्या बाजूला रुंद रबरसह स्टॅगर्ड टायर सेटअप देण्यात येणार आहे. 

6/7

442 किमीची रेंज

Afeela कारमध्ये कंपनीने 91.0-kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देत आहे. ज्यामध्ये ही कार एका चार्जमध्ये अंदाजे 442 किमी जाऊ शकते. 

7/7

कंट्रोल सिस्टम

कारमध्ये केबिनमध्ये एम्बिएंट लाइटिंगसह रोटरी कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. त्याशिवाय डिजिटल डॅशबोर्ट नियंत्रित करणारी यंत्रणा देखील देण्यात आली आहे.